
स्थैर्य, 12 मार्च, सातारा : विधी सेवा प्राधिकरण, सातारा यांच्यामार्फत जिल्हा व सत्र न्यायालय, सातारा तसेच सर्व तालुका न्यायालयात शनिवार दि. 14 मार्च 2026 रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ए.एस. वाघमारे यांनी दिली आहे.
जिल्ह्यातील सर्व न्यायालयांतील स्वरुपाची दिवाणी व फौजदारी प्रलंबित प्रकरणे दाखलपूर्व प्रकरणे तडजोडीसाठी राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये ठेवण्यात येणार आहेत. तडजोड होवू शकणारी प्रकरणे व दाखलपूर्व प्रकरणे
तडजोडीसाठी 14 मार्च 2026 रोजी राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये ठेवावयावी असल्यास संबंधित न्यायालयात जावून प्रकरण तडजोडीसाठी ठेवावयाचे आहे असे संबंधित अधिक्षक अथवा लिपिक तसेच संबंधित वकिलांना कळवावे. लोक अदालतीत झाल्याने कायमस्वरुपी वाद मिटू शकेल, वादाचे पर्यावसन कायमस्वरूपी वादात होणार नाही हाच लोक अदालतीचा हेतू आहे. शिवाय लोक अदालतीतील निकालाविरुध्द अपील होत नाही. वेळेची व पैशाची बचत होते.
लोक अदालतीमध्ये दिवाणी, तडजोडपात्र स्वरुपाची फौजदारी कौटुंबिक वाद, मोटार अपघात भरपाई प्रकरणे, भूसंपादन प्रकरणे ठेवावयाची असल्यास संबंधित वकिलांना कल्पना द्यावी किंवा माहितीसाठी जिल्हा विधी सेवा सातारा किंवा तालुका विधी सेवा समिती येथे संपर्क साधावा, असे आवाहनही प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ए.एस. वाघमारे यांनी केले आहे
