राज्य मंडळाच्या बारावी परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडून अभिनंदन


दैनिक स्थैर्य । दि. ०८ जून २०२२ । सातारा । राज्य शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी अभिनंदन केले असून विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

बारावी हा आपल्या आयुष्यातील एक टप्पा आहे. यशाची अनेक क्षितीजे तुम्हाला खुणावत असल्याने अनुत्तीर्ण विद्यार्थी व  त्यांच्या पालकांनी निराश होऊ नये. आपल्या पाल्याचा उत्साह वाढवून त्याच्या आवडत्या क्षेत्रात त्याला यश संपादन करण्यासाठी प्रोत्साहीत करावे. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनी नव्या उमेदीने आवडत्या क्षेत्रात करिअर करण्यासाठी नवे कौशल्य आत्मसात करावे.

जिल्ह्यातील  94.23 टक्के विद्यार्थी बारावी परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. यात विद्यार्थीनींचे प्रमाण अधिक असून ही आनंदाची बाब आहे. यशस्वी विद्यार्थ्यांनी विचारपूर्वक आपले क्षेत्र निवडावे. आपली आवड, क्षमता आणि सर्व पर्यायांचा विचार करीत पालक व मार्गदर्शकांशी चर्चा करून निर्णय घ्यावा. भविष्यातदेखील चांगले यश मिळवून जिल्ह्याचा नावलौकीक वाढवावा, असे पालकमंत्र्यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.


Back to top button
Don`t copy text!