दैनिक स्थैर्य । दि. १४ सप्टेंबर २०२२ । मुंबई । राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र शासन सर्वतोपरी प्रयत्नशील असल्याचे मत पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्त केले. जपानचे वाणिज्यदूत यांनी शिष्टमंडळासमवेत श्री. लोढा यांची मंत्रालयात भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते.
संशोधक सल्लागार मेगुमी शिमदा, कौन्सिल जनरल डॉ.यसुक्ता फाकोरी, डेप्युटी कौन्सिल जनरल तोशिहिरो कानिको, कुणाल चांकोर यावेळी उपस्थित होते.
मंत्री श्री.लोढा म्हणाले, राज्यात पर्यटन वाढीस चालना मिळावी यासाठी विविध उपक्रम व योजना शासनातर्फे राबविण्यात येत आहेत. पर्यटन क्षेत्रात संयुक्त प्रकल्प राबवून अधिकाधिक रोजगार निर्माण करण्यावर भर देण्यात येत असल्याचेही मंत्री श्री.लोढा यांनी यावेळी सांगितले.