युवतीवर अत्याचार करून मारहाण करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल


दैनिक स्थैर्य । दि. ३१ मे २०२२ । सातारा । सातारा शहरातील घरकाम करणाऱ्या 23 वर्षीय युवतीवर अत्याचार करून तिला लाथाबुक्क्यांनी मारहाण करणाऱ्या एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे सैराज रफिक फरास या पंचवीस वर्षे युवकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित युवती ही सातारा शहरांमध्ये एका ठिकाणी घर काम करते या युवतीच्या असहायतेचा फायदा घेऊन संबंधिताने दिनांक 11 ते 22 मे या दरम्यान लग्नाचे आमिष दाखवून वारंवार तिच्यावर अत्याचार केला तसेच याची खबर कोणाला दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली संबंधित युवकाच्या आई आई व भावाने त्या युवतीस पुन्हा 27 मे रोजी लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली या मारहाणीत ही युवती जखमी झाली असून तिला उपचारासाठी सातारा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे या अत्याचाराची कैफियत तिने पोलिसांकडे मांडल्यानंतर तिच्या जबाबावरून युवकासह त्याची आई व भावावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस उपनिरीक्षक यु डी. वाघमोडे अधिक तपास करत आहे.


Back to top button
Don`t copy text!