यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये महिला दिन उत्साहात

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । 8 मार्च 2025। फलटण। येथील श्रीराम एज्युकेशन सोसायटी यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनियर कॉलेज फलटण येथे जागतिक महिला दिन उत्साहात झाला.

यावेळी डॉ. सौ शर्मिला इनामके, मा डॉ.सौ सुनिता खराडे, मा डॉ.शैलजा कदम, प्राचार्य एस. बी. थोरात, उपप्राचार्य पी. डी. घनवट यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

प्रा. सौ. ए. एस शिंदे यांनी 8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून का साजरा करावयाचा व या कार्यक्रमाचा हेतू व महत्त्व सांगितले.

यावेळी मान्यवरांनी प्रशालेमध्ये विद्यार्थिनींना महिला दिनाचे महत्व, समाजामध्ये स्त्रियांना असणारे महत्त्व, स्त्रियांचे आरोग्य व आहार, शारीरिक व मानसिक स्वास्थ्य, आदर्श महिलांचे जीवनातील योगदान तसेच शालेय जीवनामध्ये विद्यार्थिनींनी आरोग्याची काळजी कशी घ्यावी व त्याचा आपल्या शैक्षणिक जीवनावर कसा परिणाम होतो. याविषयीची माहिती विविध उदाहरणे देऊन सांगितली. सलोनी जगताप हिने जागतिक महिला दिनानिमित्त मनोगत व्यक्त केले.

प्राचार्य एस. बी. थोरात यांनी स्त्रियांचे समाजात असणारे महत्त्व, व शिक्षणाने स्त्रियांमध्ये घडून आलेला अमुलाग्र बदल तसेच प्रत्येक यशस्वी पुरुषामागे स्त्रीचा हात असतो. याविषयी विचार व्यक्त केले. मांडले व जागतिक महिला दिनाच्या सर्व विद्यार्थिनी व शिक्षिका यांना शुभेच्छा दिल्या.
प्रा. धुमाळ व आर. एस . प्रा. सस्ते मॅडम यांनी काव्यात्मक पद्धतीने महिला दिनाचे महत्त्व सांगितले. उपप्राचार्य पी. डी. घनवट व ज्येष्ठ शिक्षिका सौ. एस. एम. भागवत यांनी महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

प्रा. जे .के. फडतरे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा आर. एस. सस्ते आभार यांनी मानले. कार्यक्रमास शिक्षिका व विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

 


Back to top button
Don`t copy text!