
स्थैर्य, सातारा, दि. 1 डिसेंबर : विद्यार्थ्यांच्या सामाजिक, वैचारिक विकासासाठी कटगुण येतील महात्मा फुले यांच्या स्मृतिस्थळी ग्रंथालयासोबतच आदर्श ज्ञानपीठ तयार करण्यात याचे. त्यातून नव्या पिढीचा सामाजिक विकास साधण्यात आपल्याला यश मिळेल, अशी सूचना आमदार महेश शिंदे यांनी केली.
महात्मा फुले यांच्या 135 व्या पुण्यतिथीनिमित जिल्हा परिषद आणि खटाव पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा फुले यांचे गाव कटगुण (ता. खटाव) येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. आमदार महेश शिंदे म्हणाले, 11 महात्मा फुले माझ्या मतदारसंघातील कटगुण गावचे ही भाग्याची गोष्ट असून कटगुण गावातील त्यांच्या स्मृतीस्थळाचा विकास करणे, हे स्मृतिस्थळ विविध भौतिक सुविधांनी परिपूर्ण बनवणे हे माझे आद्य कर्तव्य असल्याचे मी मानतो. राजकारणी आणि समाजकारणी व्यक्ती समाजासाठी भौतिक सुविधा निर्माण करतात. परंतु, महात्मा फुलेसारखे महामानव समाजाचा विचार बदलण्यासाठी झटले. महात्मा फुले यांनी सौउद्धार, समता,बंधुता आणि सत्यशोधन यासाठी आख्खं आयुष्य खचर्चा घावलं. त्यांचे कार्य आणि विचार युगे युगे अमर राहतील.महात्मा फुले यांच्या विचाराचा वारसा आम्ही सर्व जण वर्षानुवर्ष अपत असून या पुण्यभूमीतून मिळणारी स्फूर्ती आम्हाला समाजकार्य करण्यासाठी नेहमीच ऊर्जा देत असते, असे मत आमदार शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केले. महात्मा फुले यांना अभिवादन करण्यासाठी आल्यावर ते बोलत होते. या स्मृतिस्थळाच्या विकासासाठी आम्ही नेहमीच कटिबद्ध राहु, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
महात्मा फुले ट्रस्टवे सचिव सुधीर गोरे यांनी विविध मागण्यांचा प्रस्ताव प्रास्ताविकात सादर केला. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे बंधू अंकुशराव गोरे व डॉ. प्रियाताई महेश शिंदे, शिक्षणाधिकारीअनिस नायकवडी यांची भाषणे झाली. कार्यक्रमासाठी सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त रणधीर जाधव, भारती गोरे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक विश्वास सिद, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गावडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल देसाई, माध्यमिक शिक्षणाधिकारी धनंजय चोपडे, सहाय्यक गट विकास अधिकारी जयवंत दळवी, प्रशासक माधव बोईनवाड, वक्ते प्रदीप कांबले, विस्तार अधिकारी शिवाजी कदम, अरुण पाटील, सर्व केंद्रप्रमुख, शिक्षक, पंचायत समितीचे कर्मचारी, साधन व्यक्ती, पंचक्रोशीतील ग्रामस्थ व परिसरातील शाळांचे विद्यार्थी उपस्थित होते.स्मृतिस्थळ भवनामध्ये एकात्मिक बालविकास यंत्रणेद्वारे उपक्रमांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते.
स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. गटशिक्षणाधिकारी सोनाली विभुते यांनी स्वागत केले, अजित चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. शिक्षण विस्तार अधिकारी संगीता गायकवाड यांनी आभार मानले.

