मोळाचा ओढा येथे मटका अड्डयावर कारवाई


दैनिक स्थैर्य । दि. ०७ जून २०२२ । सातारा । येथील मोळाचा ओढा परिसरात सुरू असणाऱ्या मटका अड्डयावर छापा टाकून शाहूपुरी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून मटका जुगाराचे साहित्य, स्लीप बुक, रोख रक्कम असा सुमारे ६७८२ रुपयांचा ऐवज जप्त केला.

फिरोज खदबुद्दीन झारी वय ५३, रा. तामजाईनगर, सातारा, नितीन अनिल कुऱ्हाडे रा. एकतानगर, सातारा अशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत. ही कारवाई पोलिस अधिक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलिह अधिक्षक अजित बोऱ्हाडे, सहा. पोलिस अधिक्षक आँचल दलाल, पो. नि. संजय पतंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. हेड. कॉ. हसन तडवी, लैलेश फडतरे, पो. ना. अमित माने, स्वप्नील कुंभार, ओंकार यादव, पो. कॉ. सचिन पवार यांनी केली.


Back to top button
Don`t copy text!