मोफत आरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया शिबीर; मोफत नेत्र तपासणी मोतीबिंदू नेत्र शस्त्रक्रिया शिबीर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.०७ मार्च २०२२ । फलटण । भारताचे माजी उप पंतप्रधान, महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांची जयंती आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस प्रतिनिधी, श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे मानद सचिव, माजी नगरसेवक डॉ. सचिन सुभाषराव सुर्यवंशी बेडके यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून श्रीराम एज्युकेशन सोसायटी, आर्यमान फौंडेशन व फलटण तालुका कॉंग्रेस कमिटी यांच्या संयुक्त सहभागाने मोफत आरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया, नेत्र तपासणी व मोतीबिंदू शिबीराचे आयोजन करण्यात येत असून इच्छुकांनी लाभ घ्यावा असे आवाहन फलटण तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र सुभाषराव सुर्यवंशी बेडके यांनी केले आहे.

सेवासदन लाईफ लाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मिरज, अनको लाईफ कॅन्सर सेंटर शेंद्रे, डॉ. मनोहर डोळे मेडिकल फौंडेशन नारायणगाव यांच्या सहकार्याने हृदयविकार, मेंदू विकार, बायपास हृदय शस्त्रक्रिया, मोतीबिंदू नेत्र शस्त्रक्रिया, मशीनद्वारे कॅन्सर (कर्करोग) तपासणी, अंजिओग्राफी, अंजिओप्लास्टी, फिट, अर्धांगवायू, डोकेदुखी, चक्कर, स्नायूंचे आजार, किडनी विकार, हर्निया, मूळव्याध, पित्ताशयातील खडे, अपेंडिक्स, पोटाच्या व इतर शस्त्रक्रिया यासाठी शनिवार दि. १२ मार्च रोजी सकाळी १० ते दुपारी २ यावेळेत श्रीराम मंदिर लगत श्रीमंत मालोजीराजे प्रा. विद्या मंदिर, फलटण येथे सर्व रोग निदान व उपचार शिबीराचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती तालुका काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र सुर्यवंशी बेडके यांनी दिली आहे.

त्याशिवाय दि. ७ ते १२ मार्च दरम्यान दररोज सकाळी १० ते दुपारी २ यावेळेत खालील प्रमाणे नेत्र तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात येत असून तपासणीत मोतीबिंदू शस्त्रक्रियेची जरुरी असणाऱ्या नेत्र रुग्णांसाठी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे काँग्रेस कमिटी कार्याध्यक्ष अमिरभाई शेख व उपाध्यक्ष राजेंद्र खलाटे यांनी सांगितले आहे. मोफत नेत्र तपासणी शिबीर सोमवार ७ मार्च रोजी सौ. वेणूताई चव्हाण हायस्कूल तरडगाव, मंगळवार दि. ८ मार्च रोजी प्रा. आरोग्य केंद्र विडणी, बुधवार दि. ९ मार्च रोजी महात्मा फुले हायस्कूल सासवड, शुक्रवार दि. ११ मार्च रोजी प्रा. आरोग्य केंद्र गुणवरे, शनिवार दि. १२ मार्च रोजी प्रा. आरोग्य केंद्र गिरवी येथे मोफत नेत्र तपासणी शिबीरे आयोजित करण्यात येत आहेत.

अधिक माहिती व नाव नोंदणी साठी कृपया खालील पदाधिकाऱ्यांशी संपर्काचे आवाहन करण्यात आले आहे. ….
अमिरभाई शेख ८६०६९०५७८६,
राजेंद्र खलाटे ९८८१८१२३९५,
पंकज पवार ९०२१६६६४७४.


Back to top button
Don`t copy text!