दैनिक स्थैर्य । दि. ११ जून २०२२ । सातारा । राज्यातील शहरी व ग्रामीण क्षेत्रातील सुशिक्षीत बेरोजगार युवक-यवुतींची वाढती संख्या व उद्योग, व्यवसाय क्षेत्रात राज्यात विविध क्षेत्रात उपलब्ध होत असलेल्या स्वयंरोजगार व रोजगाराच्या नवीन संधी विचारात घेऊन उद्योजकतेला चालना देणारी व सर्जनशिलतेला कालानुरुप वाव देणारी सर्वसमावेशक योजना मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम सुरु करण्यात आला आहे. या अंतर्गत सुशिक्षीत बेरोजगारांना उद्योग उभारणीसाठी कर्ज पुरवठा केला जातो. या योजनेच्या लाभासाठी व अधिकच्या माहितीसाठी महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र प्लॉट नं.ए-13, एमआयडीसी, सातारा दूरध्वनी क्र. 02162-244655 यावर संपर्क साधावा.