महाराष्ट्र मिनी ऑलिम्पिक स्पर्धांचे आयोजन करणार – क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०४ जून २०२२ । मुंबई । राज्यात क्रीडामय वातावरण निर्माण करून विविध खेळांना उत्तेजन देण्याच्या दृष्टीने तसेच खेळाडूंना स्पर्धेत खेळण्याची जास्तीत जास्त संधी प्राप्त व्हावी व नॅशनल गेम्सच्या दृष्टीने खेळाडूंची तयारी व्हावी, याकरिता राज्यात “महाराष्ट्र स्टेट ऑलिम्पिक गेम्स” चे आयोजन महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने २०२२ या वर्षामध्ये करण्यात येणार असल्याची माहिती क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी दिली.

श्री. केदार म्हणाले,राज्यात क्रीडामय वातावरण निर्माण करून विविध खेळांना उत्तेजन देण्याच्या दृष्टीने तसेच आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व राज्यस्तरावर आपले नैपुण्य दाखवित असलेल्या खेळाडूंना स्पर्धेत खेळण्याची जास्तीत जास्त संधी प्राप्त व्हावी व राष्ट्रीय खेळ स्पर्धेच्या दृष्टीने खेळाडूंची तयारी व्हावी याकरिता महाराष्ट्र ऑलिम्पीक असोसिएशनमार्फत राज्यात विविध ठिकाणी मिनी ऑलिम्पिक स्पर्धा आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.

विविध खेळांना उत्तेजन देण्यासाठी व खेळाडूंना स्पर्धात्मक अनुभव मिळावा यासाठी महाराष्ट्र ऑलिम्पीक असोसिएशनच्या सहकार्याने मिनी ऑलिपीक स्पर्धा आयोजित करण्याचे प्रस्तावित होते, याचा लाभ दिव्यांग खेळाडूंच्या क्रीडा प्रोत्साहन देण्यास देखील होणार आहे. कोविडमुळे उद्भवलेल्या परिस्थितीत सन २०२०-२१ व २०२१-२२ मध्ये या स्पर्धांचे आयोजन करणे शक्य झाले नसल्याचे श्री केदार यांनी सांगितले.

आता या स्पर्धाचे आयोजन महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी पुणे येथे आयोजित करण्यात येणार आहे. या स्पर्धेच्या अनुषंगाने सुरक्षा, वैद्यकीय सुविधा, खेळाडुंच्या प्रवासाची साधने इ. बाबी उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. यासाठी राज्यस्तरावर एक उच्चस्तरीय समिती व पुणे येथे मुख्य स्पर्धा आयोजन समिती अशा दोन समित्या गठीत करण्यात आला असून राज्यस्तरावर एक उच्चस्तरीय समिती मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली आणि क्रीडा व युवक कल्याण मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आली आहे.


Back to top button
Don`t copy text!