मंगळवार पेठेतील मटका अड्ड्यावर शाहूपुरी पोलिसांचा छापा


दैनिक स्थैर्य । दि. ०८ जून २०२२ । सातारा। मंगळवार पेठेतील राजाज्ञ चौकामध्ये पान टपरी च्या आडोशाने चालणाऱ्या मटका अड्ड्यावर शाहूपुरी पोलिसांनी छापा टाकून दहा हजार 192 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला याप्रकरणी गणपत दगडू कुंभार राहणार मेढा तालुका जावली व अन्वर तब्बू सय्यद राहणार जवळ वाडी तालुका जावली या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे या कारवाईत जुगाराची स्लिप बुक पेन कार्बन रोख रक्कम असा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.

दिनांक 7 जून रोजी शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय पतंगे यांना मंगळवार पेठेतील राजाज्ञा चौकात अवैध मटका जुगार सुरू असल्याची बातमी मिळाली होती त्या अनुषंगाने पतंगे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक तयार करून कारवाई करण्याच्या सूचना दिल्या सदर पथकाने मंगळवार पेठेतील पान टपरीच्या आडोशाने चाललेल्या मटका अड्ड्यावर छापा टाकला तेथे एक इसम अवैध मटका चालवताना दिसून आला त्याच्याकडून स्लिप बुक पॅन कार्ड बंद रोख रक्कम असा 10 हजार 192 रुपयांचा मालक पोलिसांनी जप्त केला.

या संदर्भात स्वप्नील सावंत यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे यापुढेही गुन्हे प्रकटीकरण शाखा आपला कारवाईचा धडाका असाच सुरू ठेवणार असल्याचे संजय पतंगे यांनी सांगितले या कारवाईत हेड कॉन्स्टेबल हसन तडवी शैलेश फडतरे अमित माने स्वप्नील कुंभार ओंकार यादव सचिन पवार आणि सचिन सावंत यांनी कारवाईत भाग घेतला होता.


Back to top button
Don`t copy text!