भुईंजचे सायकलवेडे मुरुडेश्वर मोहिमेवर रवाना..


स्थैर्य, भुईंज, दि.२५ : गेल्यावर्षी सायकलीवरून साडेचारशे कि. मी. ची मोहीम फत्ते करणाऱ्या भुईंजच्या सायकलवेडे क्लबच्या सदस्यांनी गुरुवारी दि. २४ रोजी पहाटे ४ वाजता तब्बल ६०० कि. मी. दूर असणाऱ्या कर्नाटकातील मुरुडेश्वरकडे सायकलवरून कूच केली.

या मोहिमेतील सहभागी सायकलस्वारानी पहाटे ग्रामदैवत श्री महालक्ष्मीचे दर्शन घेऊन मोहिमेला सुरुवात केली. उपसरपंच प्रशांत जाधवराव, उद्योजक विजयसिंह तथा पिंटूकाका जाधवराव यांच्या हस्ते झेंडा दाखवून मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी पोलीस उपनिरीक्षक दयानंद दगडे, मित्र क्रीडा मंडळाचे माजी अध्यक्ष दिलीप दळवी, भुईंज प्रेस क्लबचे अध्यक्ष राहुल तांबोळी, भुईंज ऍक्टिव्हिटी क्लबचे रोहनराज ज्योतिकांत भोसले, बाल सम्राट मंडळाचे माजी अध्यक्ष वैभव पवार, वेदांत जाधवराव, अनिल लोखंडे आदी उपस्थित होते.

दररोज सुमारे २०० कि. मी. प्रवास करून सागर दळवी, संतोष ननावरे, योगेश शिर्के,  गौरव जाधवराव,अमेय पवार, मंगेश दळवी,  ओंकार ठोके, निलेश दगडे, प्रवीण ठोके, घनश्याम जाधवराव हे सर्व सायकलवेडे शनिवारी मुरुडेश्वरमध्ये दाखल आहेत. तर मोहसीन मणेर या सायकल वेड्याने कराडपर्यंत सायकलीवरून या सर्वांची सोबत केली.

या सर्व साहसवीरांचे भुईंज परिसरात कौतुक होत आहे.


Back to top button
Don`t copy text!