
सातारा – येथील छत्रपती कृषीमध्ये डॉग व कॅश शोमध्ये विविध नामवंत जातीच्या देशी व परदेशी डॉग व कॅट यांनी सातारकरांचे लक्ष वेधून घेतले. (छायाचित्र – अतुल देशपांडे)
स्थैर्य, सातारा, दि.12 नोव्हेंबर : येथील जिल्हा परिषद मैदानावर स्मार्ट एक्सपो, सांगली यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या छत्रपती कृषी 2025 या प्रदर्शनामध्ये भारतीय आणि परदेशी जातीच्या विविध श्वानांनी उपस्थित सातारकर प्रेक्षकांची मने जिंकली. आपल्या अनोख्या चाली आणि कृतीतून उपस्थित प्रेक्षकांना एक वेगळाच आनंद अनुभवता आला.
स्मार्ट एक्सपोच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या या प्रदर्शनामध्ये विशेष डॉग व कॅट शोचे आयोजन करण्यात आले होते. या डॉग शोमध्ये भारतीय जातीच्या मुधोळ हाऊंड जातीच्या अमोल मोरे यांच्या श्वानाने प्रथम क्रमांक मिळवला तर ग्रे हाऊंड प्रकारामध्ये सुयश किर्दत, निरंजन साळुंखे आणि अजित तावरे यांच्या श्वानांनी पारितोषके मिळवली. कारवान हाऊंड जातीच्या प्रकारामध्ये महेश जाधव, सोहम महामुलकर आणि आनंदा शिंदे यांच्या श्वानांनी अनुक्रमे पारितोषिक मिळवली.
पश्मी जातीच्या श्वान प्रकारात अनिकेत सोनावणे यांचा श्वान विशेष लक्ष वेधून घेणारा ठरला. वीपीटी प्रकारात बाबू शेळके यांच्या श्वानाने पारितोषिक मिळवले. लार्ज ब्रीड प्रकारामध्ये ग्रेट डेन जातीच्या अक्षय साळुंखे आणि विजय गायकवाड यांच्या श्वानांनी प्रथम व द्वितीय क्रमांक मिळविला. तर डोगो अर्जिंटिनो प्रकारात वैभव चव्हाण, सत्यम शेलार आणि प्रकाश चव्हाण यांच्या श्वानांनी पारितोषके मिळवली. मध्यम उंचीच्या प्रकारात डॉबरमॅन गटात धैर्यशील खेडेकर, अनिकेत भोसले आणि अभय पिसाळ यांच्या श्वानांनी पारितोषिके प्राप्त केली. तर रॉटविलर प्रकारात संतोष पिसाळ, अजिंक्य भोकरे आणि रवींद्र पाटील यांचे श्वान विजेते ठरले. गोल्डन रॉटविलर प्रकारात आशुतोष महामुलकर, अजय अहिरे आणि रोहन गोरे यांच्या श्वानांनी पारितोषिके प्राप्त केली. लॅब्रॉडॉर प्रकारामध्ये अजय अहिरे, महेश जाधव आणि स्वप्निल काळेकर यांच्या श्वानांनी पारितोषके मिळवली जर्मन शेफर्ड प्रकारात ओमकार भगत, निखिल कापसे आणि अश्विनी कदम यांच्या श्वानांनी पारितोषिके मिळविली.
यावेळी परीक्षक म्हणून पशुधन विकास अधिकारी डॉ. संदीप जाधव, डॉ. श्रीधर बुधे, डॉ.जयसिंग सिसोदिया, डॉ. सुनील देशपांडे, डॉक्टर पेट्स हेल्थ केअर सेंटरचे शुभम पवार, निवास चव्हाण, संकेत कणसे आणि आशिष वाचल यांनी या स्पर्धा संयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोमनाथ शेटे यांनी स्वतः केले होते. पारितोषिक प्राप्त सर्व श्वान आणि त्यांच्या मालकांना विशेष प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी कॅट शो स्पर्धेमध्ये सादर करण्यात आलेली विविध प्रकारची देशी व परदेशी जातीची मांजरे ही लक्षवेधक ठरली.
छत्रपती महोत्सवातील कॅट शो स्पर्धेमध्ये पर्शियन पंच फेस प्रकारात शाहीन मुलाणी, तमझील आतार व सिद्धार्थ गडकरी यांच्या मांजरांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवले. तर पर्शियन डॉल फेस प्रकारामध्ये नारायण पामणाणी, सोफिया पट्टणकोटे, आयेशा सय्यद यांनी पारितोषिक मिळवली. आज या छत्रपती कृषी महोत्सवाचा सांगता सोहळा होणार असून रात्री नऊ वाजेपर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहणार आहे. अद्यापही ज्या सातारकरांनी या प्रदर्शनाचा भेट देऊन आनंद लुटला नसेल त्यांनी रविवारची संध्याकाळ खरोखरच अतिशय आगळ्यावेगळ्या पद्धतीने आपल्या कुटुंबासमवेत या प्रदर्शनाला भेट देऊन घालवावी असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
