दैनिक स्थैर्य । दि. ३१ मे २०२२ । सातारा । करंजे नाका सातारा येथे महिंद्रा मॅक्सि ट्रक मधून शहाण्णव हजार रुपये किमतीच्या बॅटर्या नेणारे तिघेजण स्थानिक गुन्हे शाखेने 29 मे रोजी सकाळी साडेनऊ वाजता पेट्रोलिंग दरम्यान जेरबंद केले शहूर बागवान वय 55, शब्बीर कमरुद्दीन जमादार वय39, संदीप अशोक काटकर वय 36 राहणार खटाव सध्या राहणार कुडाळ तालुका जावळी असे ताब्यात घेतलेल्यांचे नाव आहे त्यांच्या विरोधात शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार पृथ्वीराज जाधव यांनी तक्रार दिली आहे.
प्राप्त माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेला बेकायदेशीररित्या माल काही संशयित घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली होती त्यानुसार करंजे नाका परिसरात स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून महिंद्रा मॅक्सि ट्रक आडवला आणि चालक शहर बागवान व जमादार यांच्याकडे चौकशी केली तेव्हा त्यांच्याकडे गाडीत 96 हजार रुपये किमतीच्या मोबाईल टॉवर साठी वापर देणाऱ्या बॅटरी आढळून आल्या यासंदर्भात त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांना आधी उत्तरे देता आली नाहीत या बॅटरी त्यांनी कर्नाटकातून आणल्याचे पोलिसांना सांगितले अधिक तपासासाठी त्यांना शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.