बिरदेवनगर येथून स्पेंडर मोटारसायकलची चोरी


दैनिक स्थैर्य । 7 जुलै 2025 । फलटण । ऋषिकेश संदिप नाळे (वय 19 वर्षे) रा .गुणवरे, ता.फलटण यांनी बिरदेवनगर, जाधववाडी, ता.फलटण येथील कमानीजवळ श्री गणेश स्नँक्स् अँण्ड मेसच्या समोर हिरो कंपनीची काळ्या रंगाची स्प्लेंन्डर क्रमांक एमएच 11 डी क्यू 6276 हँण्डल लाँक करून लावली होती. ही मोटारसायकल शुक्रवार दि. 4 रोजी रात्री 9 ते 10.15 वाजण्याच्या दरम्यान अज्ञान चोरट्याने चोरुन नेली.

याबाबतची फिर्याद फलटण शहर पोलीस स्टेशनमध्ये दिली आहे. या मोटार सायकलच्या पाठीमागील नंबरप्लेटच्यावर आईसाहेब असे मराठीत व पुढील बाजूस गणपतीचा फोटो रेडीयमने चिटकविलेला आहे. अधिक तपास फलटण शहर पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार अमोल रणवरे करत आहेत.


Back to top button
Don`t copy text!