
दैनिक स्थैर्य । 7 मार्च 2025। सातारा । निसर्गही बदलत चालला आहे. ग्लोबल वॉर्मिंगचा इफेक्ट आपल्या सर्वांना जाणवत असतानाच आणि थंडीत उन्हाळा, तर पावसाळ्यात हिवाळा तसेच ऐन उन्हाळ्यात धो, धो पाऊस असे विचित्र हवामान असल्यामुळे निसर्गही आता बदलत आहे.
तब्बल एक महिना बाकी असतानापुढील चैत्र महिन्याऐवजी फाल्गुन महिन्यातच सातारा शहरातील राजवाडा परिसरातील पिंपळाला अशी लुसलुशीत कोवळी पाने अर्थात नवी पालवी आली आहे . (छाया : अतुल देशपांडे, सातारा)