फलटणच्या ऋत्विक सुतारच्या गाण्याची रोशनी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये निवड


दैनिक स्थैर्य । दि. ०६ जून २०२२ । फलटण । मुळचा फलटण येथील हडको कॉलनी येथील सध्या पुणे येथे चित्रपट सृष्टीमध्ये संगीत क्षेत्रात कार्यरत असलेल्या ऋत्विक सुतारच्या मिशन परफॉर्मन्स या गाण्याची रोशनी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये निवड झालेली आहे. त्याबाबत त्याचे फलटणसह राज्यातील विविध मान्यवरांनी ऋत्विक सुतारचे अभिनंदन केले.

ऋत्विक सुतार हा सध्या मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीत संगीत दिग्दर्शक म्हणून कार्यरत आहे. यापुर्वी ऋत्विकने अनेक मराठी व हिंदी गाण्यांच्या संगीत देण्याचे काम केलेले आहे. त्याच्या उत्कृष्ट कार्यामुळेच त्याने केलेल्या गाण्याची औरंगाबाद येथे संपन्न होणार्या रोशनी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये निवड करण्यात आलेली आहे.

यापूर्वी ऋत्विक सुतार याने प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, रझा मुरड, कुमार शर्मा, अभिजीत पानसे, प्राजक्ता माळी, मिरा जोशी यांच्यासह विविध नव्या जुन्या कलाकारांच्या गाण्यांना संगीतबद्ध करण्याचे काम केलेले आहे.


Back to top button
Don`t copy text!