फलटणकरांसाठी आरोग्याची सुवर्णसंधी! ४००० रुपयांच्या ‘या’ १० महत्त्वाच्या तपासण्या आता फक्त ९९९ रुपयांत; लायन्स क्लब व सुयश लॅबचा संयुक्त उपक्रम


लायन्स क्लब फलटण आणि सुयश पॅथॉलॉजी लॅब यांच्या वतीने फलटणकरांसाठी भव्य आरोग्य तपासणी उपक्रम सुरू करण्यात आला आहे. २४ ते ३१ मार्च दरम्यान तब्बल ४००० रुपये किमतीच्या १० महत्त्वाच्या टेस्ट केवळ ९९९ रुपयात केल्या जाणार आहेत.

स्थैर्य, फलटण, दि. २३ मार्च : बदलत्या जीवनशैलीत आणि धकाधकीच्या दिनक्रमात आपल्या आरोग्याकडे अनेकांचे दुर्लक्ष होते. आजारांचे वेळीच निदान व्हावे आणि सर्वांना उत्तम आरोग्य लाभावे, या उदात्त हेतूने ‘लायन्स क्लब फलटण’ आणि ‘सुयश पॅथॉलॉजी लॅब, फलटण’ यांच्या वतीने एक अत्यंत स्तुत्य आणि अभिनव संयुक्त उपक्रम राबवण्यात येत आहे.

“आपल्या आरोग्याची काळजी घ्या” या संकल्पनेवर आधारित या उपक्रमात नागरिकांसाठी एक मोठी ‘सुवर्णसंधी’ उपलब्ध करून देण्यात आली आहे. एरवी बाहेर तब्बल ४,००० रुपये (४०००/-) खर्चून कराव्या लागणाऱ्या सर्व महत्त्वाच्या आरोग्य तपासण्या (Blood Tests) या शिबिराअंतर्गत आता फक्त ९९९ रुपयांमध्ये उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

तपासणी व नोंदणी कालावधी: नागरिकांना या सवलतीचा लाभ दि. २४ मार्च २०२६ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत घेता येणार आहे.

कोणकोणत्या तपासण्यांचा आहे समावेश?

या अवघ्या ९९९ रुपयांच्या पॅकेजमध्ये शरीराच्या निदानासाठी आवश्यक असलेल्या तब्बल १० महत्त्वाच्या टेस्ट्सचा समावेश आहे:

१) लोह टेस्ट (Iron Test)
२) किडनी प्रोफाईल (Kidney Profile)
३) लिपिड प्रोफाईल (Lipid Profile)
४) लिव्हर प्रोफाईल (Liver Profile)
५) थायरॉईड प्रोफाईल (Thyroid Profile)
६) व्हिटॅमिन बी१२ (Vitamin B12)
७) पीएसए (PSA)
८) कार्डीयाक मार्क (Cardiac Mark)
९) ब्लड काऊंट (Complete Blood Count)
१०) साखर तपासणी (Blood Sugar)

त्वरित नोंदणीचे आवाहन

हा महत्त्वपूर्ण आरोग्य उपक्रम लायन्स क्लब फलटणचे अध्यक्ष लायन महेश साळुंखे, सेक्रेटरी लायन निखिल सोडमिसे, खजिनदार लायन स्वप्निल सोडमिसे तसेच सुयश पॅथॉलॉजी लॅबचे तज्ज्ञ श्री. व्ही. एस. रसाळ (B.Sc., DMLT) आणि डॉ. दिव्या बंबा रसाळ (M.B.B.S., MD Pathology) यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली राबवण्यात येत आहे.

आरोग्याबाबत कोणतीही तडजोड न करता, फलटण शहर व तालुक्यातील सर्व नागरिकांनी आणि सभासदांनी लवकरात लवकर आपली नावे नोंदवून या सुवर्णसंधीचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

नोंदणी व तपासणीसाठी संपर्क:

  • स्थळ: सुयश पॅथॉलॉजी लॅब, ८ अ, लक्ष्मीनगर, फलटण, जि. सातारा.
  • संपर्क क्रमांक: 8010052828


Back to top button
Don`t copy text!