फडतरवाडी येथे वसंतराव नाईक यांची जयंती उत्साहात


दैनिक स्थैर्य । 7 जुलै 2025 । फलटण । फडतरवाडी, ता. फलटण येथे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. वसंतराव नाईक यांचा जयंती दिवस हा कृषीदिन म्हणून साजरा करण्यात येतो. या कार्यक्रमात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे मुख्य जनसंपर्क अधिकारी/शास्त्रज्ञ राजेंद्र भोईटे यांनी ऊस उत्पादन कसे वाढवावे, ऊसाचे बेणे कसे बनवावे, ऊसाला लागणारे खते आणि त्यांचे व्यवस्थापन याविषयी शेतकर्‍यांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमास मंडल कृषी अधिकारी सतिश निंबाळकर, सरपंच. सौ. पौर्णिमा काटे, उपसरपंच अमोल फडतरे, सोसायटीचे चेअरमन सुभाष फडतरे, सहाय्यक कृषी अधिकारी नितीन शिंदे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.जयकुमार फडतरे तसेच ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी कृषीकन्या अश्विनी महानवर, पायल नाळे, वैष्णवी चांदगुडे, सेजल दांगट, निधी कोडापे, आविष्का शिंदे, प्रचिती कुदळे उपस्थित होत्या.

कार्यक्रमास कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यु. डी. चव्हाण, श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर, कार्यक्रम अधिकारी प्रा. सुरेश साळुंखे, कार्यक्रम समन्वयक प्रा. निलिमा धालपे, कार्यक्रम अधिकारी प्रा. नितिशा पंडित, प्रा. दादासाहेब कुलाल, प्रा. आशिष फडतरे उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!