पुण्यातील कन्स्ट्रक्शन व्यावसायिकाची फलटणमधील १७ जणांकडून संगनमताने आर्थिक फसवणूक

फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. १८ जुलै २०२४ | फलटण |
पुण्यातील कोथरुड येथे राहणार्‍या ऋषीकेश श्रीपाद किनीकर या कन्स्ट्रक्शन कंपनी चालविणार्‍या व्यावसायिकाची खडकी व मलवडी (ता. फलटण) येथे राहणार्‍या १७ जणांनी संगनमताने आर्थिक फसवणूक केल्याची तक्रार फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात ऋषिकेश किनीकर यांनी दाखल केली आहे.

१) नितीन दिनकर चव्हाण (रा. फ्लॅट नं. १, रॉयल रेसिडेन्सी, ब्राम्हण गल्ली, कसबा पेठ, फलटण),
२) नारायण कोंडी सूळ
३) हरी कोंडी सूळ
४) सौ. सविता ज्ञानदेव सूळ
५) सौ. वंदना लाला सूळ
६) राजाराम रामू तरडे
७) सौ. सुमन राजाराम तरडे
८) बाजीराव रामू तरडे
९) रामू बळी तरडे
१०) हणुमंत एकनाथ तरडे
११) संतोष एकनाथ तरडे
१२) सरोजनी सोमनाथ तरडे
१३) जनार्धन नारायण सूळ
१४) सौ. अनिता बापू सूळ
१५) सौ. छाया दिनकर सूळ
१६) सौ. आक्काबाई हरिता सूळ
१७) किरण तानाजी सूळ
( नं. २ ते ५ व १३ ते १७ सर्व रा. खडकी, ता. फलटण, जि. सातारा व नं. ६ ते १२ सर्व रा. मलवडी, ता. फलटण) अशी या प्रकरणातील आरोपींची नावे आहेत.

वरील सर्व १७ आरोपींनी फिर्यादीच्या जमिनीचे खरेदी-विक्री दस्त करून फिर्यादीची आर्थिक फसवणूक व नुकसान केल्याचे फिर्यादी किनीकर यांनी तक्रारीत म्हटले आहे.

फिर्यादी ऋषिकेश किनीकर यांनी तक्रारीत म्हटले आहे की, माझे पुणे येथे ‘ओरियन कन्स्ट्रक्शन’ या नावाने कंपनी असून सदरील कंपनीचा जमीन खरेदी-विक्री तसेच कन्स्ट्रक्शन व्यवसाय आहे. माझे फलटण ते सातारा या भागात नेहमी जाणे-येणे असते. वरील आरोपींपैकी नं.१ यांचे माझ्याकडे पूर्वीपासून येणे-जाणे असून, त्यांनी अनेकवेळा माझ्या कंपनीतर्फे जमीन खरेदी-विक्री करण्याकरीता एजंट म्हणून काम केले होते व आहे. त्यामुळे माझा वरीलपैकी नं. १ यांच्यावर पूर्वीपासूनच ओळखीचे मैत्रीचे व व्यावसायिक संबंध असल्यामुळे दाट विश्वास निर्माण झालेला होता.

दरम्यान, मला फलटण भागात गुंतवणूक म्हणून व डेव्हलपमेंट करण्यासाठी जमीन क्षेत्र घेणेचे होते, हे वरील पैकी नं. १ यांना माहीत होते. मलवडी (ता. फलटण) व त्या आसपास फलटण तालुक्याच्या हद्दीत मला सुमारे ५० ते ६० एकर क्षेत्र गुंतवणूक तसेच डेव्हलपमेंटसाठी खरेदी करायची आहे, ही बाब वरील नं. १ यांना माहीत होती. त्यामुळे वरीलपैकी नं. १ हे फलटण भागातील रहिवाशी असल्याकारणाने त्या भागातील सखोल माहिती वरीलपैकी नं. १ यांना होती. त्यामुळे वरीलपैकी नं. १ यांनी फलटण भागामध्ये मला शेतजमीन दाखविण्यास सुरुवात केली व सदरील सर्व व्यवहार हे वरीलपैकी नं.१ यांनी माझ्या कंपणीचा एजंट म्हणून पाहतो, असे मला सांगितले होते.

त्यानंतर वरीलपैकी नं. १ यांनी मला मलवडी (ता. फलटण) येथील गट नं. ५६४, ५७७ व ५८० हे अनुक्रमे १२ हे. ८६ आर, १ हे. ७० आर तसेच ३ हे. ६८ आर एवढे क्षेत्र खरेदी घेणेसाठी दाखविले. सदर क्षेत्र खरेदी करतेवेळी सदरील वर नमूद गट नं. ५७७ व ५८० यामधील क्षेत्र हे मला आवडले होते. त्यामुळे सदरील क्षेत्र खरेदी करणेस मी वरीलपैकी नं. १ यांना संमती दिली होती व गट नं. ५६४ हे क्षेत्र मला आवडले नव्हते, परंतु गट नं. ५६४,५७७ व ५८० चे सर्व मालक सदरी असणारे व्यक्ती यांच्या मालकी हक्क वहिवाटीचे होते व वर नमूद तिन्हीही गट नंबर हे सदरील गटाचे मालक यांना एकत्रच विक्री करणेचे आहे असे वरीलपैकी नं. १ यांनी मला सांगितले होते. त्यावर मी व वरीलपैकी नं. १ यांनी गट नं. ५६४ च्या खरेदीबाबत विचार करीत असताना वरीलपैकी नं. १ यांनी मला असे सांगितले होते की, सदरील क्षेत्र आपण माझ्या नावावर खरेदी करू, कारण गट नं. ५७७ व गट नं. ५८० च्या आजूबाजूस असलेल्या काही क्षेत्रापैकी माझ्या ओळखीचे अनेक मालक आहेत. आपल्या क्षेत्राला लागून असलेले क्षेत्र आपण अदलाबदल करून घेऊ, त्यामुळे तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा व सदरील क्षेत्र माझ्या नावावर खरेदी करा, म्हणजे तुमचा नाहक वेळ सदरील क्षेत्र अदालाबदल करतेवेळी जाणार नाही. असे सांगून मला विनंती केली. त्यामुळे गट नं. ५६४ हे क्षेत्र वरीलपैकी नं. १ यांचे केवळ नावावर खरेदी घेणेचे ठरविले.

त्यामुळे माझ्या कंपनीच्या दैनंदीन कामामुळे मला सदरील गट नं. ५६४ च्या बाबतीत सतत फलटणला येणे-जाणे करणे शक्य नव्हते तसेच वरीलपैकी नं. १ यांच्यावर असलेल्या विश्वासामुळे मी वर नमूद क्षेत्रापैकी गट नं. ५७७ व ५८० हे स्वतःच्या नावे खरेदी करणेचे ठरवून वरीलपैकी नं. १ यांचे नावावर फलटण येथील मे. दुय्यम निबंधक सो यांचेसमोर केलेले रजिस्टर कायम खूशखरेदी दस्, त्याचा रजिस्टर नं. ५२५६ / २०१४ हा दिनांक ६ सप्टेंबर २०१४ रोजीचा मलवडी, ता. फलटण येथील जमीन गट नं. ५६४ एकूण क्षेत्र ३ हे. ६८ आर कायम खूशखरेदी दस्ताने करून घेतला होता व आहे. सदरील गट नं. ५६४ च्या अनुषंगाने केलेले दिनांक ६ सप्टेंबर २०१४ रोजीचे मे. दुय्यम निबंधक सो फलटण यांचेसमोर केलेले रजिस्टर संमतीपत्र त्याचा रजिस्टर दस्त नं. ५२७१ / २०१४ व सदरील गट नं. ५६४ च्या अनुषंगाने केलेले दिनांक १० ऑक्टोंबर २०१४ रोजीचे मे. दुय्यम निबंधक सो. फलटण यांचेसमोर केलेले रजिस्टर मान्यतापत्र त्याचा रजिस्टर दस्त नं. ५९२७/२०१४ हे केलेले होते व आहे.

परंतु सदरील खरेदीदस्तासाठी तसेच संमतीपत्र व मान्यतापत्रासाठी लागणारी संपूर्ण रक्कम ही माझी असलेली ओरियन कंन्स्ट्रक्शन कंपनीचे असलेले बँक ऑफ महाराष्ट्र शाखा पर्वती पुणे या बँक खात्यामधून खरेदी दस्तासाठी व मान्यतापत्र तसेच संमतीपत्रासाठी लागणारी संपूर्ण रक्कम सर्व खरेदी देणार यांना चेक स्वरूपात दिले होते व आहेत. त्यामुळे सदरील गट नं. ५६४ चा कायम खूश खरेदीदस्त हा केवळ अदलाबदल दस्त करतेवेळी माझा वेळ जाऊ नये या कारणासाठी वरीलपैकी नं. १ यांचे नावे केवळ व्यवस्थापनाकरीता केलेला होता. सदरील कायम खूश खरेदी दस्त हा वरीलपैकी नं. १ यांचे नावे केवळ पोकळीस्त स्वरूपात केलेला असल्याने तसेच सदरील दस्ताची सर्व खरेदी रक्कम ही मी दिल्याने वरीलपैकी नं. १ यांना कोणताही मालकी हक्क सदरील पोकळीस्त खरेदी दस्ताने मिळालेला नव्हता व नाही ही बाब वरीलपैकी नं. १ व वरील सर्वाना माहीत होती व आहे.

असे असताना काही काळाने माझ्या कंपनीचा पुण्यामध्येच व्यवसायात फार वाढ झाल्याने मी मलवडी (ता. फलटण) येथे घेतलेले क्षेत्र हे डेव्हलप करणे व त्याच्यावर व्यवसायाच्या दृष्टीने पाहणे हे थोडे लांबणीवर टाकले होते. दरम्यानच्या काळात वरीलपैकी नं.१ यांचे माझ्याकडे पुणे येथे येणे-जाणे होते. त्यावेळी अनेकवेळा वरीलपैकी नं. १ यांना गट नं. ५६४ बाबत विचारणा केली असता वरीलपैकी नं. १ हे मला असे सांगत असत की, साहेब आपले क्षेत्र अगदी जसेच्या तसे व्यवस्थित आहे, काळजी करायचे कारण नाही. त्यामुळे तसेच सदरील क्षेत्र वरीलपैकी नं. १ यांचे नावे केवळ पोकळीस्त स्वरूपाने खरेदी केल्याने तसेच सदरील क्षेत्राबाबतचे सर्वच खरेदीदस्त, संमतीपत्र व मान्यतापत्राचे मूळ दस्त हे माझ्या ताब्यात असल्याने सदरील जमिनीबद्दल नं. १ हे कोणत्याही प्रकारचे कर्ज घेणार नाहीत अथवा कोणालाही साठेखत गहाणखत करून देणार नाहीत अथवा सदरील जमीन ही विकणार नाही, असा दाट विश्वास मला होता.

असे असताना मला कोणतीही पूर्वकल्पना न देता केवळ वरील सर्वांनी सदरील पोकळीस्त खरेदीदस्त व सातबारासदरी केवळ पोकळीस्त स्वरूपाच्या नोंदीच्या सहाय्याने वरील सर्वांनी संगनमत करून सदरील जमिनींचे पोकळीस्त खरेदीदस्त वरीलपैकी नं. १ ते १७ यांनी संगनमत करून माझ्या जमीन क्षेत्रावर म्हणजे गट नं. ५६४ मध्ये खरेदीदस्त केलेले आहेत व माझी आर्थिक फसवणूक व नुकसान केलेले आहे.

या प्रकरणातील वरील सर्व १७ आरोपींवर योग्य ती कडक कायदेशीर करावी, अशी तक्रार मागणी ऋषिकेश किनीकर यांनी फलटण ग्रामीण पोलिसांकडे केली आहे.


Back to top button
Don`t copy text!