दैनिक स्थैर्य | दि. २४ फेब्रुवारी २०२४ | बारामती |
महाराष्ट्र राज्य तीर्थक्षेत्र विकास अंतर्गत ‘क’ वर्ग प्राप्त देवस्थान पुण्यमाता आईसाहेब महाराजांचे पुण्यतिथीनिमित्त पायी दिंडी सोहळा मंगळवार, दि. २७/०२/२०२४ व रविवार, दि. ०३/०३/२०२४ पर्यंत श्री क्षेत्र लाटे ते किरकसाल निघणार आहे.
मंगळवार, दि. २७/०२/२०२४ रोजी सकाळी ७ वाजता भाविक भक्तांच्या उपस्थितीत श्री आईसाहेब महाराज यांच्या पायी दिंडी सोहळ्याचे प्रस्थान होणार आहे. हा पायी दिंडी सोहळा गुरुवार, दि. २९/०२/२०२४ रोजी श्री क्षेत्र किरकसाल येथे पोहोचणार असून ग्रामस्थांतर्फे या पायी दिंडी सोहळ्याचे जंगी स्वागत होणार आहे. तसेच आईसाहेब यांच्या माहेरघरी हळदीकुंकू व उखाणे, बुत्ती व फुले टाकण्याचा कार्यक्रम होईल. संध्याकाळी ७ ते ८ हभप विकास महाराज देवडे (कर्जत) यांचे कीर्तन होणार आहे.
शुक्रवार, दि. ०१/०३/२०२४ रोजी हा पायी दिंडी सोहळा लाटे गावाकडे प्रस्थान करणार आहे. रविवार, दि. ०३/०३/२०२४ रोजी श्री क्षेत्र लाटे येथे आगमन होणार आहे. ग्रामस्थांतर्फे व भाविक भक्तांच्या उपस्थितीत या पायी दिंडी सोहळ्याचे भव्य दिव्य असे स्वागत करण्यात येणार आहे. संध्याकाळी ८ वाजता समाधी स्थळावर पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे.
समाधी महात्म्य वर्णन व समाधी सोहळा पुण्यतिथी प्रस्तावना ह. भ. प. सतीश महाराज खोमणे करतील. या सोहळ्यात विविध अन्नदाते अन्नदान करणार असून कीर्तनकार ही आपली सेवा बजावणार आहेत. समाधी स्थळावर पुष्पवृष्टी झाल्यानंतर उपस्थित भाविक भक्तांना पुण्यमाता आईसाहेब पुण्यतिथी उत्सव अन्नदान सेवा मंडळ आईसाहेब नगर यांच्यातर्फे होईल.
या सोहळ्यामध्ये सहभागी होऊन सोहळ्याची शोभा वाढवून संतसंगतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन ग्रामस्थ श्री क्षेत्र लाटे व बजरंगवाडी (ता. बारामती, जि. पुणे) यांचे वतीने करण्यात आले आहे.