दैनिक स्थैर्य । दि. १० जून २०२२ । पुणे । पुणे विध्यार्थी गृह सेवकाची सहकारी पतसंस्था मर्यादित पुणे यांची सन २०२२-२७ साठी नुकतेच निवडणूक अधिकारी सुजाता नल्ले यांचे अधिकारात दि.२५ मे २०२२ रोजी निवडणूक पार पडली .या मध्ये रघुनाथ ढोक यांचे मार्गदर्शनाखाली श्रीराम पनेल चे १३ उमेदवार बहुमताने निवडून आले तर १४ वी महिला उमेदवार सौ.राजश्री कसबे समान मतामुळे, चिट्ठी निवडीत गणेश परिवर्तन पँनेलची श्रुती कांबळे महिला व सर्वसाधारण गटातून फक्त एक उमेदवार आशिष सगणे निवडून आले.. सर्वसाधारण गटातून डॉ.योगेश ठाकरे राहुल शिरकांडे , पांडुरंग शिंदे , भाऊ बोरगे, सचिन मोहोळ, आशिष सगणे ,विकास ढमढेरे , तुकाराम शिंगटे , बाळू मोकर ,सौ .मुळे अनघा ,अनुसूचित जाती/जमातीतून चंद्रशेखर वाघमारे, विमुक्त जाती व भटक्या जमाती मधुन राजेंद्र काळे ,महिला गटातून सौ .मनिषा नाईक,सौ .श्रुती कांबळे आणि इतर मागास गटातून रघुनाथ ढोक संचालक म्हणून बहुमताने निवडून आले.
पदाधिकारी निवड देखील निवडणूक अधिकारी सुजाता नल्ले व आय .सी.सावळगी यांचे अधिकारात दि.९ जुन २०२२ रोजी दुपारी झाली. त्यामध्ये सत्यशोधक रघुनाथ ढोक यांची अध्यक्ष म्हणून फेरनिवड ,उपाध्यक्ष म्हणून राहुल शिरकांडे , सचिव म्हणून सौ.मनिषा नाईक तर खजिनदार म्हणून तुकाराम शिंगटे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड झाली.
यावेळी पतसंस्थेच्या वतीने सर्व निवडणूक प्रक्रिया योग्यरीत्या यशस्वीपणे पार पाडली म्हणून निवडणूक अधिकारी सुजाता नल्ले यांचा सत्कार नूतन सचिव सौ .मनिषा नाईक तर दुसरे अधिकारी आय.सी.सावळगी यांचा सत्कार सौ. श्रुती कांबळे यांचे हस्ते पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला. तर पतसंस्थेच्या कर्मचारी सौ. सोनाली घुटके यांचा सत्कार निवडणूक अधिकारी सुजाता नल्ले यांनी केला.
यावेळी निवडणूक अधिकारी सुजाता नल्ले म्हणाले की सभासद हिताचे जास्तीतजास्त काम करून त्यांचे साठी नवीन योजना राबवा तसेच सभासद थकबाकीदार रहाणार नाही व जमीनदार यांना त्रास होणार नाही याकडे लक्ष देऊन योग्य कर्जवाटप आणि आवर्जून विमा उतरवावा असे मौलिक मार्गदर्शन करीत मातृ संस्थेसोबत हितकारक संबध ठेवावे असे देखील म्हंटले.
या वेळी नूतन अध्यक्ष ढोक म्हणाले कि ही पतसंस्था १४.९.१९९२ ला स्थापन झाली असून तिला २९ वर्षे पूर्ण झाली आहे.संस्थेचे अधिकृत भागभांडवल ५ कोटी असून खेळते भागभांडवल १० कोटी आहे. गेली २८ वर्ष ओंडीटचा “अ” दर्जा आहे. सेवकांना तातडी कर्ज २० ते ५० हजार आणि मध्यम मुदत कर्ज २० लाख रुपये पर्यंत देत असल्याने सेवकांनाचे अनेक गरजा पूर्ण होत आहेत. यासाठी पुणे विध्यार्थी गृह व संस्थेचे सर्व विभाग वेळोवेळी अनमोल सहकार्य करीत असतात असे देखील ढोक म्हणाले तसेच अध्यक्ष म्हणून फेरनिवड झाली म्हणून सर्व संचालकाचे आभार मानत सर्वांनी ही पतसंस्था प्रगतीकडे वाटचाल करीत पुढे घेऊन जावू या असे देखील बोलले.
मोलाचे सहकार्य निवडणूक कर्मचारी विजय भागवत ,प्रदीप जगताप,राजेश ढवळे व सौ.पी.पी.गोळे तर महत्वाचे व मोलाचे सहकार्य पुणे विध्यार्थी गृहाचे कार्याध्यक्ष सुनील रेडेकर व कार्यावाह प्रा.राजेंद्र कांबळे आणि पतसंस्थेचे माजी संचालक व सोनाली सोनाली घुटके ,संदीप रंधवे ,संभाजी गोसावी यांचे लाभले तर आभार उपाध्यक्ष राहुल शिरकांडे यांनी मानले.