दैनिक स्थैर्य । दि. ०२ जून २०२२ । लोणंद । लोणंदला दि २८ जुन रोजी अडीच दिवसाच्या मुक्कामासाठी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा येत असून यावेळास दोन मुक्काम असल्याने भाविकांची गर्दी वाढणार असुन लोणंद पालखीतळ माऊलीच्या मुक्कामासाठी कमी पडणार आहे, त्यामुळे पालखी सोहळा व भाविकांची लोणंद मुक्कामी कसलीही गैरसोय होणार नाही अश्या प्रकारे पालखी सोहळयाच्या स्वागताची जय्यत तयारी करा असे प्रतिपादन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले.
लोणंद येथील पालखी तळ,पालखी मार्ग,दत्तघाट व नीरा स्नान, लोणंद नगरपंचायत पाडेगाव जलशुद्धीकरण केद्र या जागेची पाहणी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी आज बुधवार दि. १ जुन रोजी केली यावेळी त्या बोलत होत्या,
यावेळेस पोलिस अधिक्षक अजयकुमार बंसल , फलटणचे प्रांत शिवाजीराव जगताप, वाई प्रांत राजेंद्र जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बरडे, , मुख्याधिकारी संजय गायकवाड, सपोनि विशाल वायकर, डाॅक्टर प्रशांत बागडे, नगराध्यक्षा मधुमती पलंगे- गालिंदे उपनगराध्यक्ष शिवाजीराव शेळके, भरतसाहेब शेळके,रविंद्र क्षीरसागर, सागर शेळके, गणीभाई कच्छी, माजी नगराध्यक्ष सचिन शेळके, श्रीकांत इटलोड, नगर पचायत अभियंता सागर मोटे असगर इनामदार ,शंकरराव शेळके, विजय बनकर, रोहित निंबाळकर रामदास तुपे
आदी मान्यवराची प्रमुख उपस्थिती होती,
यावेळी पुढे बोलताना जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी पालखी तळावर पावसा अभावी चिखल होऊ नये म्हणून खडी आणि कच्च चा वापर करून सपाटीकरण करण्यात यावे ,जागेअभावी भाविकांची व वारकऱ्याची कसलीच गैरसोय होणार नाही असे नियोजन करावे तसेच पालखी तळ ते नीरा दत्त घाटापर्यतच्या रस्त्याच्या भोवताली वाढलेली झाडेझुडपे काढुन रस्ता वाहतुकीस मोकळा करावा, नीरा दत्तघाट येथे संत ज्ञानेश्वर महाराजाच्या पादुकांना पवित्र नीरा स्नान घातले जाते या जागेची चांगली स्वच्छता व साफसफाई करण्यात यावी, तसेच मोबाईल टॉयलेट चे योग्य नियोजन करण्याबाबत सुचना दिल्या.
अडीच दिवसाच्या मुक्कामासाठी लोणंदला संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा येत असून यावेळेस दोन मुक्काम असल्याने या वर्षी लोणंद मुक्कामी भाविकांची गर्दी वाढणार असुन लोणंद पालखीतळ माऊलीच्या मुक्कामासाठी कमी पडत आहे, त्यामुळे पालखी सोहळयातील वारकऱ्याची व भाविकांची लोणंद मुक्कामी कसलीही गैरसोय होणार नाही अश्या प्रकारे सोहळयाचे चोख नियोजन करा, ३० जुन रोजी लोणंद चांदोबाचा लिबं येथे पालखी सोहळयातील पहिले उभे रिगंण होणार असुन यावेळी लोणंद – फलटण रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होणार नाही यांची खबरदारी घ्या अश्या सुचना यावेळी जिल्हाधिकाऱ्यांकडून दिल्या आहेत.