दैनिक स्थैर्य | दि. २७ फेब्रुवारी २०२४ | फलटण |
केंद्र सरकारच्या अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत देशातील एकूण ५५४ रेल्वेस्थानकांचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील वाठार स्टेशन (ता. कोरेगाव, जि. सातारा) रेल्वेस्थानकाचाही पुनर्विकास होत आहे. या रेल्वेस्थानकाचा नूतनीकरण समारंभ सोमवार, दि. २६ फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पार पडला.
या कार्यक्रमासाठी वाठार स्टेशन येथे अॅड. सौ. जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी अॅड. सौ. जिजामाला नाईक निंबाळकर यांच्या हस्ते कोनशिला अनावरण समारंभ पार पडला.
वाठार स्टेशन रेल्वेस्थानकाच्या पुनर्विकासासाठी अमृत भारत योजनेंतर्गत ७.९७ कोटी रूपये खर्च होणार आहेत. यातून अत्याधुनिक सुविधांसह प्रवाशांसाठी आरामदायी वेटींग रूमही देण्यात येणार आहे.
याप्रसंगी विजयकाका चव्हाण, दत्तोबा धुमाळ, अमित चव्हाण, सरपंच नीता माने, प. सं. सदस्या मंगल गंगावणे, उपसरपंच सचिन जाधव, शहाजी भोईटे, मनोज कलापट, राजेंद्र धुमाळ, योगेश कर्पे, मयूर धुमाळ, डॉ. अभय तावरे, चंद्रकांत पवार, दीपक पिसाळ, रेल्वे अधिकारी जैन, टेंभेकर, चव्हाण, संगीता मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते.