पंजाबचे राज्यपाल प्रतापराव भाऊंच्या भेटीला

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २८ मे २०२२ । भुईंज । पंजाबचे विद्यमान राज्यपाल आणि चंदीगडचे प्रशासक श्री. बनवरीलाल पुरोहित यांनी शुक्र. दि. २७ मे रोजी पुणे येथे जेष्ठ नेते माजी मंत्री, माजी खासदार प्रतापराव भोसले यांची सदिच्छा भेट घेऊन जुन्या मैत्रीला उजाळा दिला.

राज्यपाल श्री. पुरोहित यांनी यापूर्वी तामिळनाडू, आसाम, मेघालयचे राज्यपाल म्हणून यशस्वी कामगिरी बजावली आहे.

तत्पूर्वी नागपूर लोकसभा मतदार संघातून ते ३ वेळा लोकसभेवर निवडून गेले आहेत. त्याच दरम्यान प्रतापराव भोसले हेही संसद सदस्य होते. त्या दरम्यान या दोघा नेत्यांमध्ये निर्माण झालेला स्नेह, मैत्र पुढे कायम राहिले आणि त्याच स्नेह, मैत्रीला उजाळा देण्यासाठी राज्यपाल श्री. पुरोहित हे आपल्या व्यस्त कारभरातून वेळ काढून प्रतापराव भाऊंना भेटन्यासाठी आवर्जून आले.

या भेटीत अनेक आठवणी, तत्कालीन राजकीय घडामोडी यावर चर्चा करत या दोघा मित्रांच्या चांगल्याच दिलखुलास गप्पा रंगल्या.

राज्यपालांनी आवर्जून आणलेली शाल, पुष्पगुच्छ भाऊंना भेट दिला. दोघांनीही परस्परांना तब्येतीची काळजी घ्या असे बजावून निरोप घेतला.

यावेळी मदनदादा भोसले,मोहन भोसले, गजानन भोसले, केतन भोसले, सुरभी भोसले, यशराज भोसले हे उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!