
स्थैर्य, सातारा, दि. 13 नोव्हेंबर : सातारा शहरातील नगरपालिकेच्या डिसेंबरमध्ये होणार्या निवडणुकीपूर्वीच शहरात विविध पेठातील अंतर्गत रस्ते तसेच गल्लीबोळही सध्या डांबरी रस्त्याने चमकू लागले आहेत .गेली अनेक महिने संततधार पावसाने अक्षरशा नकोशी केले असताना शहरातील अंतर्गत रस्त्यांची अक्षरशा विल्हे वाट लागली होती. खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा अशीच परिस्थिती असताना आता मात्र मागील आठ दिवसात सातारा शहरातील राजवाडा यादव गोपाळ पेठ, चांदणी चौक, सोमवार पेठ, फुटका तलाव,शनिवार पेठ या परिसरातील अनेक रस्ते हे हॉट मिक्स पद्धतीच्या डांबरीकरणाने तातडीने तयार करून रस्त्यांना एक नवी ओळखच दिली जात आहे. त्याची ही दृश्य आपल्या कॅमेरात टिपली आहेत सातारा येथील पत्रकार अतुल देशपांडे सातारा यांनी.

