नाहक त्रास देण्याच्या हेतूने देण्यात येणाऱ्या भेटीस आळा घालण्यासाठी वैधमापन शास्त्र विभागाचे आवाहन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०५ जून २०२२ । मुंबई । विभागीय सह नियंत्रक यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील आस्थापनांना भेटीस जाण्यापूर्वी त्याबाबतची माहिती नियंत्रक कार्यालयास व उपनियंत्रक यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील आस्थापनांना भेटीस जाण्यापूर्वी त्याबाबतची माहिती सह नियंत्रक कार्यालयास देणे आवश्यक असल्याचे निर्देश नियंत्रक, वैध मापन शास्त्र डॅा. रविंद्र कुमार सिंगल यांनी दिले आहेत.

विभागीय सह नियंत्रक  व उपनियंत्रक यांना  त्यांच्या कार्यक्षेत्रातील आस्थापनांना भेटीस जाण्यापूर्वीचे निर्देश अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे शासन परिपत्रक क्र. वैमाशा-2019/465/प्र.क्र.143/ग्रासं-३, दि. 26/11/2019 अन्वये देण्यात आलेले आहेत तसेच याबाबत वेळोवेळी नियंत्रक कार्यालयाकडूनही याबाबतचे निर्देश देण्यात आलेले आहेत. तरीसुद्धा काही अधिकारी आस्थापनांना भेटी देऊन नाहक त्रास देत असल्याचे निदर्शनास आले आहे. तरी अशा काही तक्रारी असल्यास व्यापारी व आस्थापनांना त्यांबाबत खातरजमा करता येणार आहे, असे परिपत्रक प्रसिध्दीस दिले आहे.

नाहक त्रास देण्याच्या हेतूने देण्यात येणाऱ्या भेटीस आळा घालण्यासाठी यंत्रणेतील सह नियंत्रक यांनी भेटीबाबत मुख्यालयास आगाऊ माहीती दिली असल्याबाबतची खातरजमा संबधित व्यापारी/आस्थापनांना 022- 22621968 या क्रमांकावर करता येईल. तसेच  उपनियंत्रक यांच्या भेटीबाबत खालील विभागीय कार्यालयांच्या संपर्क क्रमांकावर खातरजमा करता येईल. अशी नियंत्रक कार्यालयाकडून व्यापारी आस्थापनांना सांगण्यात आले आहे. मुंबई महानगर विभाग- बृहनमुंबई-   022-24148494 कोकण विभाग-  022-27574074 ( ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधूदूर्ग जिल्हा),पूणे विभाग-  020- 26697232 (पुणे,सातारा, कोल्हापूर,सांगली व सोलापूर जिल्हा) नाशिक विभाग-  0253- 2455696 ( नाशिक, अहमदनगर, धूळे, नंदूरबार, जळगांव) औरंगाबाद विभाग- 0240-2952656 (औरंगाबाद, बीड, जालना, लातूर, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली, नांदेड),अमरावती विभाग –  0721-2990038 (अमरावती, यवतमाळ, बुलढ़ाणा, अकोला, वाशिम),नागपूर विभाग- 0712- 2540292,( नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया) अशी माहिती नियंत्रक, वैध मापन शास्त्र विभागाकडून एका पत्रकाद्वारे प्रसिद्धीस देण्यात आली आहे.


Back to top button
Don`t copy text!