दैनिक स्थैर्य | दि. २२ फेब्रुवारी २०२४ | फलटण |
फलटण तालुक्यातील धुळदेव येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न, फलटण एज्युकेशन सोसायटी अंतर्गत कृषी महाविद्यालय फलटणच्या कृषिकन्यांनी ग्रामीण जागरूकता कृषी कार्यानुभव व औद्योगिक जोड प्रकल्प २०२३-२०२४ कार्यक्रमाअंतर्गत कीटकनाशक फवारणीवर प्रात्यक्षिक दिले.
कृषीकन्या सिद्धी शेटे, साक्षी जाधव, समृद्धी जगताप, सिद्धिका कांबळे, स्वेजल पाटील, प्रियांका शिंदे, प्रियांका भोसले व श्वेता सस्ते यांनी या कार्यक्रमाअंतर्गत धुळदेव, तालुका फलटण येथे गहू पिकावरील कीड नियंत्रणासंबंधित कीटकनाशक फवारणी कशी करावी आणि फवारणी करताना कोणती काळजी घ्यावी, याबाबत मार्गदर्शन केले. तसेच फवारणीनंतरची घ्यावयाची काळजी याची सविस्तर माहिती शेतकर्यांना दिली. या प्रात्याक्षिकास शेतकर्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्तम प्रतिसाद दिला.
कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यू. डी. चव्हाण सर, उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर सर, कार्यक्रम समन्वय प्रा. नीलीमा धालपे, कार्यक्रम अधिकारी प्रा. स्वप्नील लाळगे सर, प्रा. नितिशा पंडित, प्रा. पवार मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला.