धुळदेव येथे कृषिकन्यांनी दिली कृषीविषयक मोबाईल अ‍ॅप्लिकेशन्सची माहिती

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. २७ फेब्रुवारी २०२४ | फलटण |
फलटण तालुक्यातील धुळदेव येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न, फलटण एज्युकेशन सोसायटी अंतर्गत, कृषी महाविद्यालय फलटणच्या कृषिकन्यांनी ग्रामीण जागरूकता कृषी कार्यानुभव व औद्योगिक जोड प्रकल्प २०२३-२०२४ कार्यक्रमांतर्गत कृषीविषयक मोबाईल अ‍ॅप्लिकेशन्सवर प्रात्यक्षिक दिले.

कृषीकन्या सिद्धी शेटे, साक्षी जाधव, समृद्धी जगताप, सिद्धिका कांबळे, स्वेजल पाटील, प्रियांका शिंदे, प्रियांका भोसले व श्वेता सस्ते यांनी मोबाईलमधील शेतीविषयक विविध अ‍ॅप्लिकेशन्स जसे की अ‍ॅग्रोस्टार, मार्केट यार्ड, भारत अ‍ॅग्रो, अ‍ॅग्री अ‍ॅप, प्लांटा इत्यादींची ओळख शेतकर्‍यांना मोबाईलद्वारे करून दिली. या अ‍ॅप्लिकेशनद्वारे होणारे फायदे जसे की, चालू बाजारभाव, शेतीविषयक विविध योजना, हवामान अंदाज व शेतीविषयक आधुनिक तंत्रज्ञान इ. शेतकर्‍यांना पटवून दिले. तसेच ‘प्रगतशील शेती व आधुनिक शेती’ याविषयी माहिती मिळवण्यासाठी या अ‍ॅप्लिकेशन्सचे महत्त्व शेतकर्‍यांना पटवून दिले. कृषीकन्यांंनी हे अ‍ॅप्लिकेशन मोबाईलमध्ये डाऊनलोड करण्यापासून ते त्याचा प्रत्यक्ष उपयोग कसा करावा, याची सविस्तर माहिती शेतकर्‍यांना दिली.

कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यू. डी. चव्हाण सर, उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर सर, कार्यक्रम समन्वय प्रा. नीलीमा धालपे, कार्यक्रम अधिकारी प्रा. स्वप्नील लाळगे सर, प्रा. नितिशा पंडित, प्रा. डॉ. गोपीचंद धायगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला.


Back to top button
Don`t copy text!