दोन जुगार अड्डयावर कारवाई, पाच जणांवर गुन्हा


दैनिक स्थैर्य । दि. १० जून २०२२ । सातारा । शाहूपुरी पोलिस ठाण्यात हद्दीत पोलिसांनी दोन ठिकाणी जुगार अड्ड्यावर छापे टाकून पाच जणांवर गुन्हे दाखल केले. मोळाचा ओढा येथील कारवाईत श्यामसुंदर महादेव लोकरे वय ६१, रा. गुरुवार पेठ, दशरथ शंकर पानगुडे वय ४१, रा.सदरबझार, नितीन कुऱ्हाडे रा.करंजे यांच्यावर गुन्हा दाखल केला. संशयितांकडून ३७९६ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. दुसरी कारवाई वाढे फाटा येथे केली असून याप्रकरणी ईश्वर दत्ता सावंत वय ३0, रा.शनिवार पेठ, अतुल बबन पार्टे वय ३४ रा.नागठाणे ता.सातारा यांच्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. संशयिताकडून पोलिसांनी ६६३९७ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.


Back to top button
Don`t copy text!