थकबाकीदार किती दिवस लावणार पालिकेला चुना!

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.०५ जानेवारी २०२२ । सातारा । मालमत्ता व पाणीकरापोटी सातारा पालिकेला तब्बल ४५ कोटींचे उद्दिष्ट गाठावयाचे आहे. यापैकी आजअखेर १० कोटींचा महसूल पालिकेच्या तिजोरीत जमा झाला आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून शहरातील टॉप टेन थकबाकीदार करच भरत नसल्याने पालिकेची आर्थिक कोंडी झाली आहे. या दहा थकबाकीदारांकडून तब्बल २ कोटी ३४ लाख २९ हजार ८९८ रुपये पालिकेला वसूल करावयाचे आहेत.

पालिकेच्या हद्दीत तब्बल ३५ हजार ३०० मिळकती आहेत. पालिकेकडून निवासी मिळकतींची पाच रुपये तर व्यावसायिक मिळकतींची दहा रुपये स्क्वेअर फूट प्रमाणे कर आकारणी केली जाते. दरवर्षीप्रमाणे यंदाही वसूली विभागाने जवळपास सर्वच थकबाकीदारांना नोटीस बजावून कर भरण्याचे आवाहन केले. या आवाहनाला प्रतिसाद देत नागरिकांनी पालिकेत येऊन कर भरणा सुरू केला आहे. मात्र, शहरातील बड्या धेंड्यांचे काय? असा प्रश्न नेहमीच चर्चेचा ठरतो.
सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे थकविणाºया संबंधित थकबाकीदारांनाही पालिकेकडून नोटीस बजावण्यात आली आहे; परंतु संबंधितांकडून नोटीसीला गांभिर्याने घेतले जात नाही. पालिकेला चुना लावणाºया थकबाकीदारांवर पालिकेने कारवाईचा दंडुका उगारला तरी पालिकेच्या तिजोरीत सुमारे अडीच कोटींची भर पडू शकते. त्यामुळे वसूली ते उद्दिष्ठ गाठण्यासाठी प्रशासनाला आता ठोस पावले उचलावीच लागणार आहेत.

कर्मचाऱ्यांवर दबाव?
केवळ राजकीय हितसंबंध जोपासण्यासाठी काही राजकीय मंडळी कर्मचाºयांवर दबावतंत्राचा वापर करीत असल्याचा आरोप आजवर अनेकदा करण्यात आला आहे. मात्र, ही बाब उघडपणे कोणीही बोलत नाही. यामध्ये केवळ पालिकेचे नुकसान होत असून, पालिका कर्मचाºयांना नोटीस बजावण्यापलिकडे कोणतीही ठोस कारवाई करता येत नाही.

पालिकेच्या नोंदीनुसार सातारा शहरातील ‘टॉप टेन’ थकबाकीदार
मिळकत क्रमांक   पत्ता   एकूण थकबाकी
१५१००७०२२ – १७४, १७५,१७५,१७५ रविवार पेठ ७५,४१,३१४
११३०२२०४५ – ३६ ई तोफखाना परिसर २५,२९,५४०
१२१०१०४०९ – ५७/१ मल्हारपेठ २३,७९,९२५
१०१००८५८० – ३२७/१क, ३३३/ब, ३३४/४ कोटेश्वर मंदिराजवळ २३,११,०६१
४१०२२४९४ – ५२३अ/१/४ जिल्हा परिषदेजवळ १८,९७,१७५
१०१००८६२६ – ३२७/१, ३३३ब करंजे पेठ, कोटेश्वर मंदिराजवळ १६,८९,५८३
१५१००६९२८ – १७५ रविवार पेठ १४,६९,९१६
२०२००२७९३ – २१,२१,१,२२,२२,७ प्रतापगंज पेठ १२,९६,२६३
१०१००८२६५ – ४० करंजे पेठ ३२७/३३३ कोटेश्वर मंदिराजवळ १२,१५,८५०
१५१०१००२२ – २८१/२अ २८१/२ब बाजार समिती ११,१९,२७१


Back to top button
Don`t copy text!