स्थैर्य, फलटण, दि. ०४ : रेडिओ ऑरेंज आणि जॉन्सन लिफ्ट्स आणि एस्केलेटरचे “इंस्पायर वुमन अवॉर्ड्स 2021” नागपूरमध्ये संपन्न झालेल्या कार्यक्रमामध्ये तिरंगा फौंडेशनच्या सेक्रेटरी सौ. रजनी शिंदे यांना “इंस्पायर वुमन अवॉर्ड्स 2021” ने केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी व मंदिरा बेदी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमास तिरंगा फौंडेशनचे अध्यक्ष रणजीत शिंदे तसेच संचालक डॉ. पोपटराव मोहिते, प्राचार्य रविकुमार तिकटे व तिरंगा कॉलेजचा संपूर्ण स्टाफ उपस्थित होता.
विविध तरुण व तरुणी कलाकारांसाठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरती नवीन संधी उपलब्ध करून देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. विशेष व अत्यंत महत्त्वाचा भाग हा की तिरंगा फौंडेशन नेहमीच सामाजिक व प्रेरणादायी उपक्रमात अग्रेसर आहेच. त्यात सामाजिक जाणीवेने सतत मुलीना व स्त्रियांना विकसित करण्यासाठी सौ. रजनी शिंदे ह्या तिरंगा फौंडेशनच्या सेक्रेटरी म्हणून कार्यरत आहेत. त्यासाठीच त्यांना रेडिओ ऑरेंज आणि जॉन्सन लिफ्ट्स आणि एस्केलेटरने त्यांची निवड “इंस्पायर वुमन अवॉर्ड्स 2021” साठी केली. तिरंगा फौंडेशनच्या विविध कामा मध्ये सौ. रजनी शिंदे सतत अग्रीगणी असतात, असे मत तिरंगा फौंडेशनचे अध्यक्ष रणजित शिंदे यांनी व्यक्त केले.