
दैनिक स्थैर्य । दि. ०२ जून २०२२ । सातारा । सातारा तालुक्यातील डोळेगाव येथे एका युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबतची नोंद बोरगाव पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. याबाबत बोरगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. ३१ मे रोजी ७ वाजण्यापूर्वी डोळेगाव येथील गोसावीवस्ती येथे तेथीलच अमोल हणमंत मोरे वय २३ याने राहत्या घरातील लोखंडी अँगलला ओढणीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची खबर विनायक बजरंग मोरे यांनी बोरगाव पोलीस ठाण्यात दिली.