डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेसाठी मदरशांनी ३० ऑगस्ट पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन


दैनिक स्थैर्य । दि. ०१ जुलै २०२२ । सातारा । मदरशांमध्ये शिकत असलेल्या विविध वयोगटातील विद्यार्थ्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पारंपारिक धार्मिक शिक्षणाबरोबरच विज्ञान, गणित, समाजशास्त्र, हिंदी, मराठी, इंग्रजी व उर्दु या विषयाचे शिक्षण देणे, मुख्य प्रवाहातील शाळामध्ये प्रवेश घेणा-या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती देणे, परिणामी विदयार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेमध्ये वाढ होवून त्यांची रोजगार क्षमता वाढून आर्थिक दर्जा सुधारण्यास मदत होईल या दृष्टीने मदरशांच्या आधुनिकीकरणासाठी पायाभूत सुविधा, ग्रंथालयासाठी अनुदान देणे व शिक्षकांच्या मानधनासाठी अनुदान देण्याची डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना राबविण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. या योजनेचा परिपूर्ण प्रस्ताव मदरशांनी दिनांक 30 ऑगस्ट 2022 पर्यंत जिल्हा नियोजन समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा येथे सादर करावा असे, जिल्हा नियोजन अधिकारी  य. वि. थोरात यांनी कळविले आहे.


Back to top button
Don`t copy text!