झूमकारच्या ताफ्यात २०,००० कार्स

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०२ जून २०२२ । मुंबई । उदयोन्मुख बाजारपेठांमधील कार शेअरिंगची आघाडीचे बाजारस्थळ असलेल्या झूमकारने आपल्या भारतातील व्यापक झूमकार वाहन शेअरिंग मंचावर २०,००० कार्स आहेत असे आज जाहीर केले. आपल्या भक्कम नैसर्गिक वाढीच्या जोरावर २०२२ च्या अखेरीपर्यंत भारतात नफा कमावण्याची क्षमता प्राप्त होईल असे कंपनीला अपेक्षित आहे.

झूमकारचे सहसंस्थापक व सीईओ ग्रेग मोरान झूमकारच्या या यशाबद्दल म्हणाले, “आमच्या मंचावरील होस्ट्स व गेस्ट्स दोहोंच्या संख्येतील, नैसर्गिक वाढीचा वेग बघून आम्ही खरोखर उत्साहित झालो आहोत. झूमकारच्या ग्राहकांना आनंददायी अनुभव देण्यावर आमची टीम सातत्याने लक्ष केंद्रित करत आहे. आम्ही आता आमच्या बाजारस्थळा कार्यक्षमता बांधणीचे काम दुपटीने करत आहोत आणि या वर्षाच्या अखेरीस आम्ही भारतामध्ये नफ्यात येऊ असे अपेक्षित आहे.”

झूमकारने स्थापनेपासून स्थिर वाढ साध्य केली आहे. अधिकाधिक व्यक्ती अतिरिक्त निष्क्रिय उत्पन्न कमावण्यासाठी आपल्या कार्स या प्लॅटफॉर्मवर होस्ट करत आहेत. सरासरी झूमकार होस्ट्सना दर महिन्याला ५०,००० रुपयांहून अधिक उत्पन्न मिळते आणि अनेक होस्टनी गेल्या ६ महिन्यांत ३ लाखांहून अधिक उत्पन्न कमावले आहे. या मार्केटप्लेसवर आता ऑडी, मर्सिडिज आणि मिनी कूपर यांसारख्या लग्झरी कार्स निवडीसाठी उपलब्ध आहेत, तसेच टाटा सफारी व एमजी हेक्टर प्लस यांसारखी ७ आसनी वाहनेही यावर उपलब्ध आहेत. लग्झरी कार्सच्या होस्टना झूमकारच्या माध्यमातून गेल्या ६ महिन्यांत ५ लाख रुपयांहून अधिक उत्पन्न मिळाले आहे. त्यांचे सरासरी उत्पन्न महिन्याला ७०,००० रुपये आहे.

झूमकार इंडियाचे सीईओ निर्मल एनआर झूमकारच्या वाढीबद्दल म्हणाले, “झूमकारच्या कार-शेअरिंग मार्केटप्लेसमुळे व्यक्तींना भारतभरातील वाहनांच्या सर्वांत वैविध्यपूर्ण श्रेणींतून निवडीची संधी मिळते आणि आम्ही भारतात आता आमच्या अनन्यसाधारण कार-शेअरिंग प्लॅटफॉर्मवर २०,०००हून अधिक कार्स उपलब्ध करून देत आहोत हे जाहीर करणे आमच्यासाठी खास अनुभव आहे. आमच्या प्लॅटफॉर्मचा वापर करणाऱ्या होस्ट्सच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे आणि झूमकारवर होस्टिंगचे आर्थिक फायदे अधिकाधिक जणांना लक्षात येऊ लागल्यामुळे ही संख्या आणखी वाढेल असे आम्हाला अपेक्षित आहे. भारतातील शहरी भागातील वाहतुकीशी निगडित आव्हानांना तोंड देण्याच्या दृष्टीने स्थानिक उपाय निर्माण करण्यातील आमची बांधिलकी या स्थिर वाढीतून दिसून येत आहे.”


Back to top button
Don`t copy text!