जैन सोशल ग्रुपच्यावतीने फलटणमध्ये कामगारांचा सत्कार


दैनिक स्थैर्य । 2 मे 2025। फलटण । येथील एसटी बस स्थानकात स्वच्छता करणार्‍या आठ महिला कर्मचारी तसेच शहरातील महापुरुषांचे पुतळे स्वच्छ करून पुतळ्यासमोर आकर्षक रांगोळी काढणारे बंडु अहिवळे व किराणा दुकानात 20 वर्ष प्रामाणिक सेवा करणारे अवचित ढेंबरे यांचा जैन सोशल ग्रुपच्यावतीने शाल व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी फलटण आगार व्यवस्थापक राहुल वाघमोडे, स्थानक प्रमुख सुहास कोरडे, जैन सोशल ग्रुपच्या व्यसनमुक्ती कमिटी कन्व्हेनर सुर्यकांत दोशी, जैन सोशल ग्रुपचे अध्यक्ष श्रीपाल जैन, सचिव सौ. निना कोठारी, माजी अध्यक्ष राजेंद्र कोठारी, संगिनी माजी अध्यक्षा सौ. अपर्णा जैन, जैन सोशल ग्रुपचे संचालक प्रितम गांधी उपस्थित होते.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष राहुल वाघमोडे यांनी जैन सोशल ग्रुप च्या गौरवाद्गार काढले. सत्कार मूर्ती महिला व महापुरुषांचे पुतळे स्वच्छ करणारे बंडू अहिवळे यांनी धन्यवाद दिले. कार्यक्रमाचे श्रीपाल जैन यांनी प्रास्ताविक केले. सौ. वृषाली गांधी यांनी सूत्रसंचालन केले. सौ. नीना कोठारी आभार मानले.


Back to top button
Don`t copy text!