जैन समाजाकडून कीर्ती स्तंभाच्या सुशोभीकरण समितीच्या अध्यक्षपदी अनुप शहा यांची निवड

कार्याध्यक्षपदी डॉ. सूर्यकांत दोशी


दैनिक स्थैर्य | दि. २५ फेब्रुवारी २०२४ | फलटण |
फलटणमधील जैन समाजाची बैठक श्री १००८ पार्श्वनाथ जैन मंदिर येथे संपन्न होऊन शहरातील प्रमुख चौकात असलेल्या कीर्ती स्तंभाच्या सुशोभीकरणसाठी समिती तयार करण्यात आली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी फलटण शहर भाजपचे अध्यक्ष व माजी नगरसेवक अनुप शहा यांची एकमताने निवड करण्यात आली, तर कार्याध्यक्षपद डॉ. सूर्यकांत दोशी यांना देण्यात आले.

कार्यकारिणी निवडण्याचा अधिकार अध्यक्ष यांना देण्यात आला. यावेळी समाजाच्या वतीने परमपूज्य आचार्य विद्यासागर महाराज यांना भारतरत्न देण्यात यावे, यासाठी एकमताने ठराव करण्यात येऊन लवकरच यासंदर्भातील निवेदन मोर्चाद्वारे देण्याचे ठरले आहे.

बैठकीला समाजातील प्रकाश दोशी, वाकडमाने, अनंतकुमार दोशी, सागर शहा, विशाल दोशी, प्रीतम गांधी, स्वरूप व्होरा, जीनेश गांधी, स्वप्निल दोशी, सुमित दोशी, प्रीतम शहा, श्रीकांत सावळे, श्रीपाल जैन, रमण रणदिवे, स्वीकार मेहता, यशराज गांधी यांच्यासह मोठ्या संख्येने जैन युवा वर्ग उपस्थित होता.


Back to top button
Don`t copy text!