जिल्ह्यात सहा दारु अड्डयावर कारवाई १३ हजार २२० रुपयांचा मुद्देमाल जप्त


दैनिक स्थैर्य । दि. ०२ जून २०२२ । सातारा । सातारा जिल्ह्यात सहा वेगवेगळ्या ठिकाणी सूरु असणाऱ्या दारु अड्डयावर पोलिसांनी छापे टाकुन १३ हजार २२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, लाडेगाव ता. खटाव येथे तेथीलच चंद्रकांत एकनाथ यादव याच्याकडून ९६०, पुसेसावळी ता. खटाव येथे तेथीलच रविंद्र किसन पवार यांच्याकडून १ हजार ४२०, शेवाळवाडी फाटा ता. कराड येथे तेथीलच अनिल परशुराम सूर्यवंशी याच्याकडून ६ हजार ७२०, अपशिंगे ता. सातारा येथे माळ नावाच्या शिवारात गंजीच्या आडोशाला पांडुरंग श्रीरंग मोहिते रा. आंबेवाडी, ता. सातारा याच्याकडून ९९०, पानवन ता. माण गावच्या हद्दीत घराच्या आडोशाला तेथीलच नाथा शामराव नरळे याच्याकडून १ हजार ४४०, मेढा चौक ता.जावली येथे टॉवरच्या भिंतीच्या अडोशाला तेथीलच आनंदा धोंडीबा ढेबे यांच्याकडून ५ हजार ७६० रुपये किमतीची दारू जप्त करण्यात आली.


Back to top button
Don`t copy text!