जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत अंमली पदार्थ सेवन व अवैध तस्करी विरुद्ध दिन साजरा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २८ जून २०२२ । सातारा । जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सातारा व यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ सोशल वर्क, जकातवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने अंमली पदार्थ सेवन व अवैध तस्करी विरुद्ध आंतरराष्ट्रीय दिन साजरा करण्यात आला.

यावेळी ॲङ मनिषा बर्गे यांनी अंमली पदार्थांचे सेवन आणि अवैध तस्करी या कायद्यांतर्गत असणाऱ्या तरतुदी व शिक्षा अंमली पदार्थांमुळे कशा प्रकारे नुकसान होते व त्यासाठी कोणती काळजी घ्यावी आणि व्यसनाधिन झालेल्या व्यक्तींवर कोठे उपचार करावेत व त्यांचे समुपदेशन करण्या विषयी सखोल मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमास प्राचार्या शाली जोसेफ यांच्यासह विद्यार्थी, विद्यार्थींनी उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे प्रभारी सचिव यू.एस. बाबर व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.


Back to top button
Don`t copy text!