दैनिक स्थैर्य । दि. ०२ जून २०२२ । मुंबई । जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामाबाबतचा विस्तृत आराखडा तयार करुन हा आराखडा प्राधान्याने सार्वजनिक बांधकाम विभागाला सादर करण्यात यावा, असे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी आज दिले.
जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाबाबतची आढावा बैठक आज मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, वैद्यकीय शिक्षण आयुक्त वीरेंद्र सिंह, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
जळगाव येथे नेमून दिलेल्या कालावधीत महाविद्यालयाचे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. हे करीत असताना एचएससीसी कंपनीने महाविद्यालय उभारणीसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व परवानग्या आणि आराखडे सार्वजनिक बांधकाम विभागाला सादर करुन तांत्रिक मान्यतेसह मंजूर करुन घ्यावेत, अशा सूचना मंत्री श्री. देशमुख यांनी दिल्या.