
दैनिक स्थैर्य । 26 मार्च 2025। फलटण । फलटण शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत बुधवारी रात्री 1 वाजण्याच्या सुमारास छोटा हत्ती गाडीत (क्रमांक एमएच 11 बीएल 3577) दहा हजार किंमतीची काळे पांढर्या रंगाची जर्सी गाय कत्तल करण्याच्या उद्देशाने बेकायदेशीरपणे वाहतूक करताना आढळून आली, अशी माहिती फलटण शहर पोलिस स्टेशनचे निरीक्षक हेमंतकुमार शहा यांनी दिली.
याप्रकरणी गाडीचालक ज्ञानेश्वर उत्तरेश्वर पंढरे, (वय 47), रा.धुळदेव, ता. फलटण व राजाराम रामु मदने, (वय 60), रा. 22 फाटा धुळदेव, ता.फलटण यांच्याविरोधात कत्तलीसाठी बेकायदेशीर जनावरांची वाहतूक केल्याप्रकरणी फलटण पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबतची फिर्याद सौरभ सुनिल सोनवले ( वय 26 वर्षे), रा.भडकमकरनगर, फलटण यांनी दिली.
फलटण शहर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक अनिल भोसले अधिक तपास करत आहेत.