दैनिक स्थैर्य । दि. ०१ जून २०२२ । सातारा । पेरणी करताना अथवा पेरणीनंतर जमिनीमध्ये पुरेसा ओलावा किंवा वापसा नसेल तर बियाण्याच्या उगवणक्षमतेवर विपरीत परिणाम होतो. तसेच शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता निर्माण होते. यामुळे 75 ते 100 मि.मी. पाऊस झाल्याशिवाय पेरणी करु नये. पुरेसा पाऊस न झाल्यास संरक्षीत सिंचन सुविधा उपलब्ध असेल व जमिनीत पुरेसा ओलावा व वापसा असेल तरच पेरणी करावी, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी कार्यालयाकडून करण्यात आले आहे.
सर्व पिकाच्या बियाण्यास बिजप्रक्रीया करुनच पेरणी करावी. सोयाबीन बियाणे अत्यंत नाजुक असून बियाण्याची उगवणक्षमता तपासून दर्जेदार व गुणवत्तापूर्ण बियाणे पेरणीसाठी निवडावे. याबाबत अधिक माहितीसाठी नजीकच्या कृषी सहायक, कृषि पर्यवेक्षक, मंडल कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असेही आहवान जिल्हा अधिक्षक कृषी कार्यालयाकडून करण्यात आले आहे.