
सातारा – येथील छत्रपती कृषी महोत्सवातील राधा सोबत अनिकेत बोराटे. (छायाचित्र : अतुल देशपांडे, सातारा)
स्थैर्य, सातारा, दि. 17 नोव्हेंबर : येथील जिल्हा परिषद मैदानावर सुरू झालेल्या छत्रपती कृषी 2025 या भव्य प्रदर्शन सोहळ्याला बुधवारी सकाळपासून प्रारंभ झाला आहे.
या महोत्सवात यावर्षी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये मानांकन मिळवलेली दोन फूट आठ इंच उंचीची सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील मलवडी गावची अनिकेत बोराटे यांची सर्वात कमी उंचीची राधाम्हैस ही लक्ष वेधून घेत आहे. अनेक नागरिक हे प्रदर्शनाबरोबरच खास हे आकर्षण पाहण्यासाठी येथे प्रदर्शनाला भेट देत आहेत.
दरम्यान छत्रपती कृषी 2025 महोत्सवात विविध नामवंत कंपन्यांचे स्टॉल, गृहपयोगी वस्तू तसेच साहित्य खरेदीसाठी सातारा जिल्ह्यातूनच नव्हे तर पर जिल्ह्यातूनही नागरिक मोठ्या संख्येने येत असून अतिशय व्यवस्थितरीत्या साकारलेल्या या स्टॉलमध्ये सुमारे 200 स्टॉल मध्ये ग्राहकांची हे स्टॉल वरील साहित्य पाहण्यासाठी तसेच खरेदी करण्यासाठी गर्दी होत आहे.
खवय्यांसाठीही येथे मोठी पर्व् णी असून विविध प्रकारचे व्हेज, नॉनव्हेज चविष्ट पदार्थ येथे उपलब्ध करण्यात आले आहेत. तसेच बालगोपाळांसाठीही मनोरंजन नगरी उभारण्यात आली असून विविध खेळ तसेच करमणुकीचे कार्यक्रम येथे आयोजित केले गेले आहेत.या प्रदर्शनातभारतातील विविध कंपन्यांचे ट्रॅक्टर्स व शेती अवजारे एकाच ठिकाणी शेतकरी बांधवांना पाहण्याची संधी मिळणार असून शेती विषयक प्रक्रिया उद्योग यासंदर्भात महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या शेतकर्यांसाठीच्या सर्व योजनांची माहिती देणारी दालने या प्रदर्शनात आहेत. तसेच फक्त दहा मिनिटांमध्ये एक एकर क्षेत्राची फवारणी करणारे रिमोट ऑपरेटेड ड्रोनचे लाईव्ह.
प्रात्यक्षिक व शेतकरी बांधवांना फवारणी क्षेत्रातील नवीन उद्योग करण्यासाठी उपयुक्त असा ड्रोन चे दालन येथे उपलब्ध आहे तसेच शेतीमधील विविध तंत्रज्ञानाची माहिती देणारी दालने व प्रात्यक्षिक,सेंद्रिय शेतीचे विशेष दालन प्रात्यक्षिक,भाजीपाला रोपवाटिका व विविध दुर्मिळ अशा प्रजातीचे दालन या प्रदर्शनात आहे. याशिवाय हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानाचे लाईव्ह प्रात्यक्षिक पाहायला मिळत असून दुर्मिळ देशी 500 हुन बियाण्यांचे प्रदर्शन व विक्री येथे उपलब्ध करण्यात आली आहे. कृषी महोत्सव म्हणून परदेशी भाजीपाला प्रदर्शन, शेतीविषयक पुस्तकाचे दालन, तज्ञ मान्यवरांची व्याख्याने, नवीन तंत्रज्ञान सौर ऊर्जा विषयी दालने माहिती व प्रदर्शन तसेच गृहोपयोगी वस्तूचे भव्य दालन येथे उपलब्ध करण्यात आले आहे. तसेच दि. 21 नोव्हेंबर रोजी डॉग आणि कॅट प्रेमी साठी… डॉग आणि कॅट शोचे आयोजन सकाळी दहा ते सहा या वेळेत केले असूनआणि फॅन्सी ड्रेस कॉम्प्टेशन संपन्न होणार आहे. आता हे प्रदर्शन 23 नोव्हेंबर पर्यंत रात्री नऊ पर्यंत दररोज सुरू राहणार असून या प्रदर्शनाला मोठ्या संख्येने भेट देऊन आनंद लुटावा असे आवाहन संयोजक स्मार्ट एक्सपोचे सोमनाथ शेटे यांनी केले आहे .

