दैनिक स्थैर्य । दि. ०३ जून २०२२ । मुंबई । चिपळूण येथील अपरांत रुग्णालयात मागील वर्षी जुलै महिन्यात पूर परिस्थितीमुळे मरण पावलेल्या 8 कोविड रुग्णांच्या नातेवाइकांना विशेष बाब म्हणून मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांनी प्रत्येकी 4 लाख रुपये आर्थिक मदत जाहीर केली आहे. ही मदत राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून केली जाईल.
21 आणि 22 जुलै 2021 रोजी पूर आल्याने अपरांत रुग्णालयाच्या कोरोना केंद्रात 8 कोविड रुग्णांचा मृत्यू झाला होता व रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत या मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदतीची विनंती करण्यात आली होती. मुख्यमंत्र्यांनी मानवतेच्या दृष्टिकोनातून विशेष बाब म्हणून आर्थिक मदतीची घोषणा केली.