
दैनिक स्थैर्य । दि. १० जून २०२२ । सातारा । राज्य निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये चुकीचे आरक्षण धोरण केले आहे. आरक्षण चक्रनुक्रमे फिरणवण्याचा निर्णय हा मागासवर्गीयांचे अस्तित्व संपवणारा आहे. पहिल्या धोरणाप्रमाणे लोकसंख्येनुसार आरक्षण देण्यात यावे अशी मागणी रिपाइंचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत केली.
ते पुढे म्हणाले, राज्य निवडणूक आयोगाच्या निर्णय हा मागासवर्गीयांचे अस्तित्व संपवणारा आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेमधील महत्वपूर्ण घटक असलेल्या ग्रामपंचायत असून आजही गावामध्ये मागासवर्गीय नागरिक एका बाजूस रहवास करतात. चक्रनुक्रमे आरक्षण हे पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद निवडणुकीसाठी योग्य आहे. मात्र, ग्रामपंचायत निवडणुकीसाठी हि आरक्षण पद्धत धोकादायक आहे ती रद्द करण्यात यावी यानंतरच जिल्हयासह राज्यातील ग्रामपंचायत निवडणुका घेण्यात याव्यात अशी मागणी गायकवाड यांनी केली .
तसेच पावसाळ्यात गतवर्षी ज्याप्रमाणे पूरग्रस्त किंवा भूसंकलन झाले तसे होऊ नये म्हणून धोकादायक ठिकाणच्या कुटूंबे स्थलांतराचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय योग्य आहे. मात्र, कास परिसरातील हॉटेल, महाबळेश्वर व पाचगणी परिसरातील बेकायदेशीर धनधांडग्यांनी बांधलेली कड्याला लागून बंगले हि सील करण्यात यावेत. याबाबत लवकर निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.