दैनिक स्थैर्य । दि. ११ जून २०२२ । सातारा । गोडोली पालखी चौक येथे छापा मारून स्थानिक गुन्हे शाखा व औषध प्रशासन यांनी संयुक्तरीत्या चार लाख 95 हजार 570 रुपयांचा गुटखा जप्त केला यंदाच्या वर्षात अण्णा औषध प्रशासनाकडून ही पहिल्यांदाच मोठी कारवाई झाली आहे याप्रकरणी पोलिसांनी एका इसमाला ताब्यात घेतले आहे गोडोली येथील पालवी चौकांमध्ये एका इसमाकडे विशिष्ट ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गुटका उपलब्ध असल्याची माहिती सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती ठाणे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी आपले खास पथक गोडोली येथे तैनात केले अण्णा औषध प्रशासन विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी रोहन राजेंद्र कुमार यांच्या उपस्थितीत हा छापा मारण्यात आला यामध्ये एमडी पानमसाला हिरा गुटका विमल पान मसाला इत्यादी पान मसाला तंबाखू मिश्रित असल्याचे खात्री करण्यात आली या सर्व मालाची किंमत साधारण चार लाख 95 हजार पाचशे सत्तर रुपये आहे पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल व अपर पोलीस अधीक्षक अजित बोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली या कारवाई मध्ये साहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गरजे संजय शिर्के शरद बेबले साबिर मुल्ला इत्यादी कर्मचाऱ्यांनी भाग घेतला होता.