
स्थैर्य, सातारा, दि. 1 डिसेंबर : राज्यात कांदा पिकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होत असून शेतकरी सर्वसाधारणपणे कांदा जमिनीवर पसरवुन ठेवून किंवा स्थानिकरित्या तयार केलेल्या थाळीमध्ये कांद्याची साठवणूक करतात. व्यामुळे कांदा सडून मोठ्या प्रमाणावर नुकसान होते तसेच कांद्याची प्रत व टिकाऊपणा यावर विपरीत परिणाम होतो शास्त्रशुध्द कांदाचाळ उभारणीमुळे कांद्याची योग्य गुणवत्ता राखली जाऊन शेतकर्यांना अधिक नफा मिळत असल्याने कांदाचाळ उभारणीकडे शेतकर्यांचा कल वाढत आहे यामुळे एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत सन 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये कमी खचचि कांदाचाळ लसूण साठवणूक गृह हा घटक राबविण्यात येत असून 5 ते 25 मे. टन, 25-500 मे. टन व 500-1000 मे. टन क्षमतेच्या कांदा चाळी/लसूग साठवणूक गृह उभारणीसाठी क्षमतेनुसार अनुदान अनुज्ञेय आहे. अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे यांनी दिली.

