गिरवीच्या जयंतराव देशपांडे यांचा रामेश्वरममध्ये भव्य कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते सत्कार


दैनिक स्थैर्य । दि. ०३ जून २०२२ । फलटण । फलटण तालुक्यातील गिरवी येथील श्री गोपालकृष्ण मंदिराचे उत्तराधिकारी जयंतराव देशपांडे यांचा नुकताच रामेश्वरम (तामिळनाडू) येथे भव्य कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

तामिळनाडू येथील रामेश्वरम येथे देशभरातील विविध प्रांतातील ११०० चे वर महिला साधकांनी राम तांडव स्तोत्राचा पठणाचा अभूतपूर्व कार्यक्रम यशस्वी रीतीने पार पाडला. या सोहळ्यास विशेष निमंत्रित म्हणून जयंतराव देशपांडे यांना उपस्थित राहण्याचे आमंत्रण होते. या महिलांच्या संघटनेस अध्यात्मिक मार्गदर्शन व आशीर्वाद यामुळे हा भव्य दिव्य सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला असे महिला संघटना आयोजकांनी मत व्यक्त केले.

यावेळी संघटनेचे राष्ट्रीय प्रमुख सौ. माधुरीजी यांनी अलिकडेच नवी दिल्ली हून गिरवी ला दर्शनासाठी भेट देऊन या मंदिराचे महात्म्य व भेटीबद्दल समाधान व्यक्त केले. रामेश्वरम येथील सत्कारास तंजावर येथील राजे बाबाजीराजे भोसले तसेच जागतिक पातळीवर प्रसिध्द अर्थतज्ज्ञ व पत्रकार एस. गुरुमुर्ती उपस्थित होते. जयंतराव देशपांडे यांच्या जीर्णोध्दार व भक्तीमार्ग प्रचार व प्रसार व अध्यात्मिक मार्गदर्शन याबद्दल त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.


Back to top button
Don`t copy text!