गरिबांचा कायापालट करण्याची यांची भाषा प्रेम नसून मगरीचे अश्रू – खासदार उदयनराजे भोसले यांची आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यावर नाव न घेता टीका


दैनिक स्थैर्य । दि. २२ जुलै २०२२ । सातारा । झोपडपट्टी वसाहतीमधील निम्न श्रेणीचे जीवन जगणाऱ्या गरिबांचा कायापालट करण्याची काही जणांची भाषा हे त्यांचे खरे प्रेम नसून हा ढोंगीपणा आहे. मगरीचे अश्रू आहेत त्यांचे हे नवीन ढोंग माजगावकर माळ काय साताऱ्यातील सर्वच झोपडपट्टी सदृश्य वसाहतीमधील नागरिकांनी ओळखली आहे अशी खरमरी टीका खासदार उदयनराजे भोसले यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यावर त्यांचे नाव न घेता केली आहे

या संदर्भात जलमंदिर येथून प्रसिद्ध झालेल्या पत्रकार नमूद आहे की, ” सातारा शहरात माजगावकर माळ, लक्ष्मी टेकडी, भिमाबाई आंबेडकर नगर ,सदर बाजार रामाचा गोट, राजलक्ष्मी पिछाडी अशा बरेच ठिकाणी झोपडपट्टी आहेत येथील सर्व गरीब गरजू मजूर कष्टकरी सर्वसामान्य जनता राहते आज ज्यांनी काही ढोंग केले आहे त्यांचेच सर्वेसर्वा असणारे सर्व शक्तिमान हे तत्कालीन सत्ताधीश असताना येथील झोपडपट्ट्या उठवण्याबाबत व लोकांना हाकलून लावण्याबाबत नगरपालिकेत ठराव पारित केला होता बुलडोझर आणि मशिनरी आणून येथील लोकांना देशोधडीला लावण्याचे पूर्ण नियोजन केले होते पोलीस लाईनच्या पाठीमागील भागात झोपड्यांच्या वस्तीत पोलीस बंदोबस्तात नगरपरिषदेमार्फत झोपड्या आठवणीत आल्या आणि काही क्षणात लोकांना बेघर करण्यात आले येथे माणसे झोपडीत राहत असली तरी ती माणसे आहेत त्यांच्याही भावना आहेत ते सर्वसामान्य असले तरी मनाने मोठे आहेत अशी मोठी भूमिका घेऊन पंतप्रधान घरकुल योजने सारखी विकास कामे राबवली या ठिकाणी मूलभूत सुविधांसह नागरिक सुविधा देण्यात आले आहेत झोपडपट्टी हटवण्यासाठी आम्ही कधी कारणीभूत राहिलो नाही उलट त्यांना मूलभूत सुविधा, सुरक्षितता देऊन आम्ही माणूस म्हणून जगण्याचा विश्वास कसा देता येईल याची काळजी घेतली. जेथे त्यांनी ढोंग केले त्या माजगावकर माळ येथे पीएमआय योजनेअंतर्गत शाहूपुरी पोलीस स्टेशन ते आकाशवाणी अखेर रस्ता डांबरीकरणासाठी 75 लाख रुपये आणि आकाशवाणी ते महानुभव मठ अखेर रस्त्यासाठी 75 लाख असे दीड कोटी रुपये मंजूर केले आहेत करंजे इंडस्ट्रियल इस्टेट अंतर्गत रस्त्याच्या डांबरीकरणाचा यामध्ये समावेश आहे पाऊस संपल्यानंतर या कामांना सुरुवात होणार आहे

म्हणूनच संबंधितांनी कायापालट कशाला म्हणतात हे आधी समजून घ्यावे त्यांच्या या तथाकथित ढोंगी कार्याकडे एक कुतूहल म्हणून बघण्यापलीकडे त्याला फारशी किंमत आहे असे वाटत नाही यांचे श्रेयाचे सोंग आणि इतर ढोंग मागे पाहिले आहेत पुढेही पाहायला मिळतील त्यांचे पुतना मावशीचे प्रेम सर्व झोपडपट्टी वासीय चांगलेच ओळखतील असाही टोला उदयनराजे यांनी लगावला आहे


Back to top button
Don`t copy text!