गणेशोत्सवानिमित्त किरण कांबळे यांचे व्याख्यान संपन्न

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २० सप्टेंबर २०२१ । वडूज । वडूज शिक्षण विकास मंडळ वडूज संचलित हुतात्मा परशुराम विद्यालय ज्युनियर कॉलेज व महात्मा ज्योतिबा फुले प्राथमिक शाळा प्रेरणा शालेय पूर्व केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विद्यार्थी गणेशोत्सवानिमित्त व्याख्यानमालेतील चौथे पुष्प विद्यालयाचे गणित शिक्षक किरण कांबळे यांनी गुंफले. त्यांचा विषय होता भारत माते तव प्रणाम.

आपल्या व्याख्यानामध्ये त्यांनी भारतीय संस्कृतीचा गौरवशाली इतिहास वर्णन केला भारताने जगाला काय दिलं ?याची विस्तृत माहिती सांगितली. भारतीय परंपरा व त्या पाठीमागील वैज्ञानिक दृष्टीकोन, भारताच्या प्राचीन ग्रंथांमधील वैज्ञानिक तत्वे,जगातील सर्व प्राचीन संस्कृतींमध्ये आज केवळ भारतीय संस्कृतीच शिल्लक आहे. त्यामागील कारणे. भारताने जगाला दिलेली अध्यात्मिक रत्ने, संतांची परंपरा, भारताने लावलेले शोध, भारतीय संस्कारातील मूल्ये इत्यादींची माहिती विशद केली. स्त्रीत्वाचा सन्मान करायला भारताने जगाला शिकविले. असे अनेक पैलू त्यांनी आपल्या व्याख्यानातून सर्वांसमोर मांडले. अतिशय प्रभावी व उत्तम शैलीमुळे सर्व श्रोते मंत्रमुग्ध झाले.

या कार्यक्रमाला वडूज शिक्षण विकास मंडळाचे नितीन जाधव गोविंद भंडारे उपस्थित होते. श्री गोविंद भंडारे यांनी आपल्या भाषणातून त्यांच्या प्रभावीपणे मांडलेल्या विचाराचे कौतुक केले. उपमुख्याध्यापक महेश गोडसे, पर्यवेक्षक डी.जे. फडतरे व बी. एस. माने उपस्थित होते. सर्व शिक्षक वृंद तसेच ऑनलाइन पद्धतीने विद्यार्थी व पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष स्वामी तर आभार प्रदर्शन अनिल राऊत यांनी केले. ए. के. माने यांनी मार्गदर्शन केले.


Back to top button
Don`t copy text!